Laxman Hake esakal
महाराष्ट्र बातम्या

Laxman Hake: ''सुधीर मते माझ्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष, मला त्याचा अभिमान'' बीडच्या नेत्याचं विधान

संतोष कानडे

पुणेः ओबीसींच्या हक्कासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचा आरोप मराठा संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. हाकेंनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन वाद घातल्याचा दावा मराठा तरुणांनी केला होता, या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. पोलिस ठाण्यामध्ये काही मराठा तरुणांवर गुन्हाही दाखल झाला आहे.

ज्या सुधीर मते यांचं नाव लक्ष्मण हाके वारंवार घेत होते ते सुधीर मते हे राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. संघटनेचे संस्थापक गंगाधर काळकुटे यांनी मीडियाशी संवाद साधून मतेंचा अभिमान असल्याचं म्हटलंय.

बीड येथील गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं की, अखंड मराठा समाज मनोज जरांगे पाटील आणि युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी यापूर्वीसुद्धा काही वक्तव्य केलेले आहेत. सुधीर मते हा माझ्या राष्ट्रीय छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे त्याचा मला अभिमान आहे. हाके काळे धंदे करतात, ते आम्ही उघडे पाडले आहे.

काळकुटे पुढे म्हणाले की, संभाजीराजे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी तिथे गेलो होतो. तू दारू पितो आणि दुसऱ्यांना शिकवतो, असा जाब आम्ही विचारला होता. हाकेंना कुठलाही त्रास दिला नाही, मला अभिमान आहे आमच्या कार्यकर्त्यांनी हे केले आहे.

नेमकं काय घडलं?

लक्ष्मण हाके हे सोमवारी रात्री पुण्यातील कात्रज-कोंढवा रोड परिसरात असताना काही मराठा सामाजातील तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्याबाबत हाके यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर हे तरुण त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होते. पण यावेळी हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोपही या तरुणांनी केला. यातून त्यांच्यामध्ये वाद वाढत गेल्यानं हाके आणि मराठा तरुण हे कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी मराठा तरुणांनी हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासंपूर्ण घटनेचा आणि पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

वैद्यकीच चाचणी

सोमवारी रात्री मराठा तरुणांनी हाके यांना जाब विचारत त्यांना कोंढवा पोलिस ठाण्यात नेले. येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. यानंतर हाके यांची वैद्यकिय चाचणी करण्यात आली.मराठा कार्यकर्त्यांच्या मगणीनंतर लक्ष्मण हाके यांची ससुन रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली. या चाचणीच्या प्राथमिक अहवालातून त्यांनी दारु पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी आणखी एक-दोन दिवस लागू शकतात. त्यानंतर हाके यांनी मद्य घेतले होते की नाही ते कळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Baba: वाराणसीतल्या मंदिरांमधून साई बाबांच्या मूर्ती हटवल्या अन् गंगेत केल्या विसर्जित; सनातन रक्षक दलाचं कृत्य

Shivneri Bus: शिवनेरी बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'; हवाई सेवेच्या धर्तीवर भरत गोगावलेंची पहिलीच मोठी घोषणा

Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

Latest Maharashtra News Live Updates: राज ठाकरे ऑक्टोबरमध्ये संभाजीनगर, नाशिक अन् पुणे दौऱ्यावर

''या क्षणाला आम्हालाही खात्री नाही''; MS Dhoniच्या आयपीएल २०२५ खेळण्याबाबत CSK चं मोठं विधान; त्याला Uncapped...

SCROLL FOR NEXT