Maharashtra Assembly Session 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Porsche Accident: "पुण्याचा उडता पंजाब झाला," अधिवेशनातही गाजले पोर्शे अपघात अन् ड्रग्ज पार्टी प्रकरण

Maharashtra Assembly Session: यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी, "आरोपी श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला सोडले जातेय का? असा प्रश्न उपस्थित केला.

आशुतोष मसगौंडे

महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी सकाळी पुण्यातील पोर्शे अपघात आणि एल थ्री ड्रग्ज पार्टी प्रकरण गाजले.

यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे 'उडता पंजाब' झाले असल्याचा आरोप केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "पुणे 'उडता पंजाब' झाले आहे. शहरातील अवैध बार, पब्ज आणि हॉटेल्सवर प्रशासनाचा कोणताही वचक राहिला नाही. ससूनसारखे सरकारी रूग्णालयही ड्रग्जचा अड्डा झाले आहे."

यावेळी वडेट्टीवार यांनी या अवैध पब्ज, हॉटेल आणि बारकडून हप्ते घेत जातले असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, "पुण्यात जवळपास 450 ओपन टेरेस हॉटेल्स आहेत. त्या प्रत्येक हॉटेलकडून पाच लाखांचा हप्ता घेतला जातो. तर छोट्या मोठ्या हॉटेलकडून 75 हजार ते 2.5 लाख रूपये घेतले जातात."

पोर्शे अपघात प्रकरणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "पुणे शहरात 27 अवैध पब्ज आहेत. कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातातील पोर्शे कारची नोंदणी नव्हती, नबंर प्लेट नव्हती. हे असे प्रकार चालू असताना पुणे पोलीस आयुक्त झोपले होते का?"

विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पुण्यात घडलेल्या दोन्ही प्रकरणांची आम्ही दखल घेतली आहे. पोलिसांनी अपघात घडल्यापासून आरोपींसह या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई केली आहे. अपघातानंतर पोलिसांंनी तत्काळ गुन्हे दाखल केले. त्यानंतर ससूनमधील ज्या डॉक्टरांनी रक्तांच्या नमुन्यात छेडछाड केली त्यांनाही अटक केली. याचबरोबर अल्पवयीन मुलांना दारू देण्याऱ्या हॉटेलचा परवाना निलंबीत केला आहे."

यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी, "आरोपी श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला सोडले जातेय का? असा प्रश्न उपस्थित केला.

यावर उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आरोपी गरीब असो की श्रीमंत त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना द्यायला हवी होती. पण ती त्यांनी दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT