Pune Rain update esakal
महाराष्ट्र बातम्या

Pune Rain : पुण्यात बरसणार! 'या' ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, IMD ने दिली माहिती

Sandip Kapde

Pune rain update : राज्यात अनेक अनेक ठिकाणी सध्या कडक ऊन आहे. त्याचवेळी काही भागांत मोसमी पाऊसही होत आहे. दरम्यान हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. 

महाराष्ट्रात येत्या ३-४ तासात रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह  वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.  

चक्रीवादळ बिपोरजॉय देखील वेगाने तीव्र वादळात रूपांतरित होत आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दरम्यान वाऱ्याचा वेग १५० किमी प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. (Pune rain update)

विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता-

मृगनक्षत्राला सुरुवात होऊनही मॉन्सूनचा पत्ता नाही. कधी येणार याबाबत दररोज नवे अंदाज येत असतानाच तापमानात वाढ होताना दिसत आहे. मात्र, हवामान विभागानुसार आता आनंदाची बातमी असून, पुढील पाच दिवस अकोल्यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याच शक्यता आहे. मात्र, हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fireworks Accident: गणपती विसर्जनात फटाक्याची आतिषबाजीमुळे 11 महिला ढोलवादक जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर! मंडळावर कारवाईची मागणी

Pune Firing: खानापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा मृत्यू, गावात पोलिस बंदोबस्त वाढवला

On This Day: अफगाणिस्तानचा 'करामती' खान! राशिदने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही, तर IPL, BBL अन् CPL मध्येही घेतली हॅट्रिक

Latest Marathi News Updates : Apple चा iPhone 16 खरेदीसाठी मुंबईत 'ॲपल स्टोअर'च्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी

Palak Paneer Dosa: सकाळी नाश्त्यात बनवा चवदार पालक पनीर डोसा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT