Sharad Pawar Narendra Modi Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवार कार्यक्रमात राष्ट्रवादी रस्त्यावर; नेमकी भूमिका काय? पुणे शहराध्यक्ष जगताप म्हणतात...

संतोष कानडे

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. परंतु दौऱ्याला विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध होतांना दिसून येतोय. यातला विरोधाभास म्हणजे राष्ट्रवावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मोदींसोबत कार्यक्रमात असणार आहेत आणि त्यांचा गट मात्र रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या प्रदान करण्यात येईल. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, मोदींच्या पुणे दौऱ्याला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष व विविध संघटना विरोध करणार आहेत.

मणिपूर राज्य पेटलेलं असतांना आणि तिथे महिलांवर राजरोसपणे अत्याचार सुरु असतांना नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जात नाहीत. दुसरीकडे त्यांना पुण्यात येऊन खासगी संस्थेचा पुरस्कार स्वीकारण्यास वेळ आहे. या मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदींच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवून निषेधाची भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना भूमिका विषद केली. जगताप म्हणाले की, शरद पवार कधीच जाती-धर्मात आणि पक्षापक्षात भेदाभेद करीत नाहीत. ज्याला मदतीची गरज आहे, त्याला ते मदत करतात. मागच्या ६० वर्षांपासून पवारांची हीच भूमिका राहिलेली आहे.

जगताप पुढे म्हणाले की, डॉ. दीपक टिळक आणि रोहित टिळक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवार यांच्यामार्फत आमंत्रण दिलेलं होतं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनामध्ये भाजपचा हात असला तरी यावेळीच शरद पवार यांचा दृष्टीकोन वेगळा आहे.

''आम्ही शरद पवार साहेबांशी आंदोलनाबाबत चर्चा केलेली नाही. त्यांनीही आम्हांना नकार दिलेला नाही. त्यामुळे आंदोलन होणार. मणिपूर प्रकरणामुळे आम्ही पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार'' अशी भूमिका यावेळी प्रशांत जगताप यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT