Amruta Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Amruta Fadnavis : '...खरं तर मामीला मेंदूच्या सर्जरीची गरज होती पण...'; पुण्यात काँग्रेस आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

पुणेः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पुण्यामध्ये काँग्रेसने आंदोलन करीत अमृता फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला.

''आपल्या भारत देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित 'अभिरूप न्यायालयात' त्यांनी हे विधान केलं.

आज पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अमृता फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने घोषणाबाजी केली. पुण्यातील गुडलक चौकात काँग्रेसच्या महिला कार्यर्त्यांनी आंदोलन केलं. 'अक्कल कमी जीभ लांब' अशा घोषणा दिल्या. तसेच अशा मजकुराचा पाट्या काँग्रेसकडून यावेळी झळकवण्यात आल्या.

"अमृता फडणवीस मामीला मेंदूच्या सर्जरीची गरज होती पण मामीने तोंडाची सर्जरी केली त्यामुळे राष्ट्रपिता आणि राष्ट्रविक्रेता यातला फरक त्यांना कळला नाही" अशी टीका महिला काँग्रेसकडून करण्यात आली. यावेळी शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Candidate List: राज्यातील 288 मतदारसंघातील लढती, कुठे कोण आहेत उमेदवार, कुठे होणार तगडी फाईट?

Amit Shah: “तुमच्या चार पिढ्या आल्या तरी पुन्हा कलम 370 आणू शकणार नाहीत”; अमित शहांनी राहुल गांधींना सुनावलं

Latest Maharashtra News Updates : धुळे जिल्ह्यात सव्वा दोन एकरात गांजाची शेती; सुमारे ६ कोटींचं पीक उध्वस्त

KL Rahul - आथिया शेट्टी होणार आई-बाबा! सोशल मीडियावरून केली घोषणा

TET Exam : आता ‘टीईटी’ परीक्षेवर राहणार ‘एआय’ची नजर...!! परीक्षार्थींची फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक हजेरी होणार

SCROLL FOR NEXT