Punjabrao Dakh Sakal
महाराष्ट्र बातम्या

Panjab Dakh : ...म्हणून पंजाब डख यांचा अंदाज चुकला?, सोशल मीडियामध्ये समर्थक अन् विरोधक भिडले

संतोष कानडे

मुंबईः 'हवामानाचा अजूक अंदाज व्यक्त करणारे अभ्यासक' अशी ओळख असलेले पंजाबराव डक यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरु आहे. पंजाबराव डख यांच्या चुकीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पंजाबराव डख यांनी मान्सूनचा अंदाज व्यक्त करतांना १० जून ते १५ जूनपर्यंत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवून बी-बियाणं अन् खतं खरेदी केले. परंतु पाऊस पडलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची ओरड होत आहे.

सोशल मीडियात सध्या याच मुद्द्यावरुन घमासान सुरु आहे. पंजाब डख यांच्या चुकीच्या अंदाजामुळे व्यापारी मालामाल झाले असून शेतकरी देशोधडीला लागल्याचं सांगितलं जातंय. यासंबंधी चार दिवसांपूर्वी पंजाब डख यांनी त्यांच्या फेसबुकवरुन एक व्हीडिओ शेअर केला होता.

या व्हीडिओमध्ये पंजाब डख यांनी अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे बाष्प नाहीसं झालं आणि पाऊस लांबला, असं स्पष्टीकरणं दिलेलं आहे. मात्र पाऊस लांबल्याने मराठवाड्यातील सोशल मीडिया ग्रुपमध्ये समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडलेले आहेत.

व्हीडिओमध्ये काय म्हणाले पंजाब डख?

१३ जूनच्या व्हीडिओमध्ये पंजाब डख म्हणतात, १६ जूनला चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. हे वादळ बाष्प ओढून घेऊन जाणार असून मान्सून कमकुवत होणार आहे. २०१५ला अशीच परिस्थिती झाली होती. चक्रीवादळामुळे बाष्प वाहून गेलं होतं. २०१९लाही असंच चक्रीवादळ आलं आणि बाष्प तिकडे गेलं, असं डख म्हणाले. जमिनीमध्ये ओल आली तरच पेरणी करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्याला धडकलं असतं तर पाऊस झाला असता, असाही एक अंदाज आज पंजाब डख यांनी दिला आहे. जमिनीत एक इंच ओल असल्याशिवाय पेरणी करु नये, असं त्यांनी सांगितलं. निसर्गातील बदलांचं आणि बदलत्या हवामानाचं निरीक्षण करुन पंजाब डख अंदाज व्यक्त करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT