Radhakrishna Vikhe Patil Satyajeet Tambe esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : सत्यजित तांबेंच्या विजयानंतर नवा ट्विस्ट; भाजपच्या बड्या नेत्यानं केला मोठा गौप्यस्फोट

नाशिक पदवीधर निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यापासून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिली.

हेमंत पवार

डॉ. तांबे यांना मुलालाच उमेदवार म्हणून पुढं करायचं होतं तर, त्यांनी काँग्रेसचा (Congress) पर्याय का निवडला नाही, हा प्रश्न चर्चेत आला.

कऱ्हाड : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, त्यामुळंच त्यांचा विजय झाला, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी केला.

नाशिक पदवीधर निवडणूक (Nashik Graduate Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यापासून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिली. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखे-पाटील यांच्या व्यतिरिक्त पकड बसविणाऱ्या थोरात-तांबे घराण्याशी संबंधित हे प्रकरण होतं. सलग तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसनं एबी अर्ज दिलेला असतानाही ऐनवेळी माघार घेऊन पुत्र सत्यजित तांबे यांना अपक्ष रिंगणात उतरवलं.

भाजपनं दाखवला उमेदवार न उभा करण्याचा चाणाक्षपणा

डॉ. तांबे यांना मुलालाच उमेदवार म्हणून पुढं करायचं होतं तर, त्यांनी काँग्रेसचा (Congress) पर्याय का निवडला नाही, हा प्रश्न चर्चेत आला. त्यामुळंच या सर्व घडामोडींमागं भाजपचे (BJP) डावपेच असल्याची चर्चा रंगली. भाजपनंही उमेदवार उभा न करण्याचा चाणाक्षपणा दाखवित डावपेच अधिकच गहिरे केले. तांबे यांना शेवटपर्यंत अधिकृतपणे पाठिंबा जाहीर करण्याचं टाळणाऱ्या भाजपनं स्थानिक पातळीवर कार्यकर्तेच काय ते ठरवतील, अशी भूमिका घेऊन नेमकं काय शिजत आहे, हे दाखवून दिलं.

तांबेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा

त्याचाच संदर्भ देत मंत्री विखे -पाटील यांनी कऱ्हाडमध्ये तांबे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल वक्तव्य केलं आहे. कृष्णा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी मंत्री विखे-पाटील हे कऱ्हाड दौऱ्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले उपस्थित होते. मंत्री विखे-पाटील म्हणाले, सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, त्यामुळंच त्यांचा विजय झाला. त्यांनी आता भाजमध्ये जाण्याचाच निर्णय घेतला पाहिजे. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत, त्यामुळं त्यांच्या आभारतच त्यांचं उत्तर दडलेलंय, असं सांगून त्यांनी अधिक बोलणं टाळलं.

अतुल भोसलेंना ताकद देऊ

भाजपचे अतुल भोसले हे सक्षम नेते आहेत, असं सांगून महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले, त्यांनी कऱ्हाडमधून नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळं या भागाच्या विकासासाठी जे-जे करायचं आवश्यक आहे, ते त्यांनी करावं. त्यासाठी त्यांना आम्ही पाठबळ देऊ, अशी स्पष्टोक्तीही विखे-पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपाचे उमेदवार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना ५१७८ मतांची आघाडी घेतली

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT