Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

मित्राला राज्यभेवर आणण्यासाठी पवारांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता

दत्ता लवांडे

तब्बल २४ वर्षानंतर महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या परस्पर विरोधामुळे आणि कुणीच उमेदवारी माघे न घेतल्याने राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. १० जूनला या निवडणुका पार पडणार असून महाराष्ट्रातल्या सहा जागेसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी या दोघांनाही अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे घोडेबाजार होणार आहे हे स्पष्ट झालंय. पण २००६ साली शरद पवारांनी आपल्या मित्राला राज्यसभेवर निवडून आणण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला हरवलं होतं.

जून २००६ सालची गोष्ट आहे. यावर्षीसारख्या तेव्हाही राज्यसभेच्या निवडणुकांची लगबग चालू होती. त्यावेळी काँग्रेसकडून आविनाश पांडे हे उमेदवार राज्यसभेसाठी उभे होते आणि त्यांच्या विरोधात राहुल बजाज. खरं तर राज्यसभेसाठी प्रमोद महाजन हे भाजपाचे ठरलेले उमेदवार होते. पण त्यांच्या निधनामुळे राहुल बजाज यांना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाली होती. पण राहुल बजाज हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून चार उमेदवार राज्यसभेसाठी जाणार होते पण मोठं आव्हान होतं ते अविनाश पांडे यांना जिंकून आणण्याचं. राहुल बजाज हे अपक्ष होते पण त्यांना भाजपचा आणि शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा होता. पण शरद पवारांना आपल्या उमेदवारांपेक्षा राहुल बजाज निवडून येण्याची मनोमन इच्छा होती.

rahul bajaj sharad pawar

पण शरद पवार आणि राहुल बजाज हे एकमेकांचे जिगरी मित्र. शरद पवार केंद्रामध्ये कृषीमंत्री होते. त्याअगोदरपासूनच शरद पवार आणि बजाज यांचे चांगले संबंध. राहुल बजाज यांची शरद पवार हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा होती. एकदा एका पत्रकाराने याविषयी पवारांना विचारले असता ते म्हणाले होते की, "ते आमचे चांगले हितचिंतक आहेत. त्यांना वाटतं की आपल्या मित्राने पुढे जावं, यापेक्षा मी त्यांच्या कधी खोलात गेलो नाही. ठीक आहे पण ते त्यांचं मत होतं." असं पवार म्हणाले होते. पवार बोलताना त्यांच्या जुन्या मैत्रीचे दाखले देत असत. त्यांची स्तुती करताना म्हणायचे की, "ते स्पष्ट आणि स्वच्छ स्वभावाचे आहेत. आमचा कधी वैचारिक मतभेद व्हायचा तेव्हा ते जे काही ऐकवून दाखवायचंय ते दाखवायचे पण त्यांचा कधी वाईट हेतू नव्हता." अशा शब्दांत ते बजाज यांची स्तुती करायचे.

पण २००६ च्या राज्यसभेच्या निवडणुकांवेळी त्यांना राहुल बजाज निवडून यावेत ही मनोमन इच्छा होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अविनाश पांडे यांना पाठिंबा न देता राहुल बजाज यांना पाठिंबा देऊन त्यांना जिंकून आणलं होतं. तेव्हा काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांना अविनाश पांडे यांना पाठिंबा न देण्यावरून विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले होते की, "राहुल बजाज यांना मी ओळखतो, अविनाश पांडे यांना कोण ओळखतं? जो व्यक्ती महाराष्ट्राच्या परिचयाचा आहे त्याला निवडून द्यायला पाहिजे." असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं होतं. निवडणुका कधीही जिंकता येतील पण आपल्या मित्रासाठी त्यांनी केलेला त्याग खूप मोठा आहे.

निवडून आल्यावर राहुल बजाज यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबतच उद्योग जगताचं नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान दुचाकी वाहनांच्या बाबतीत संसदेत कोणताच मुद्दा बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून पाठवण्यात शरद पवारांचं मोठं योगदान होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

SCROLL FOR NEXT