Rahul Gandhi In Sangli Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi In Maharashtra: शिवाजी महाराज अन् काँग्रेसची विचारधारा एकच; सांगलीतून राहुल गांधींचे मोदी सरकारवर हल्ले

Rahul Gandhi In Sangli: सांगलीतील पलूस-कडेगावमध्ये माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज आनावरण होत आहे.

आशुतोष मसगौंडे

सांगलीतील पलूस-कडेगावमध्ये माजी मंत्री स्व. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज आनावरण होत आहे. यासाठी राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती आहे. या कार्यक्रमात बोलताना राहुल यांनी मोदी सरकार भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि काँग्रेसची विचारधारा एकच असून आम्ही कायम लोकांच्या कल्याणासाठी काम करत आलो आहोत.

काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांनी दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे उद्घाटन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.

"शिवाजी महाराज आणि काँग्रेसची विचाराधार एकच"

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, "हे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात तिरस्कार पसरवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेली विचारधारेची लढाईही जुनी आहे. आज ही लढाई काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. यापूर्वी ही लढाई शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्मा फुले यांनी लढली. त्यामुळे या महापुरुषांच्या आणि काँग्रेसच्या विचारधारेत कोणताही बदल नाही."

ते पुढे म्हणाले, "तुम्ही जर शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचले असले तर तुम्हाला लक्षात येईल की, आपल्या संविधानात त्यांच्या अनेक कल्पना आहेत."

पतंगरावांनी पडत्या काळात साथ दिली

यावेळी राहुल गांधी यांनी पंतगराव कदम यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक केले आणि म्हटले की, "पतंगराव कदम यांनी इदिरा गांधी आणि काँग्रेसला पडत्या काळात साथ दिली. त्यांचे शिक्षण क्षेत्रात योगदान मोठे आहे."

पुढे ते असेही म्हणाले की, "माझ्या बब्बर शेर कार्यकर्त्यांनी भाजपला भयभीत करून सोडल आहे. महाराष्ट्र पहिल्यापासून पुरोगामी राज्य असून फुले, शाहू आणि आंबेरकर यांनी देशाला प्रेरणा दिली आहे.

उद्धव ठाकरे यांची दांडी

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत केल्याबद्दल उद्धव ठाकरे आणि विश्वजीत कदम यांच्यात तणाव निर्माण झाला होता. असे असूनही काही दिवसांपूर्वी विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी ठाकरेंची भेट घेत यावर पडदा टाकला होता.

दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित असताना आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे यासाठी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे विश्वजीत-विशाल यांच्या बंडखोरीवर ठाकरे अजूनही नाराज असल्याचे दिसते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT