अर्धापूर : भारत जोडो यात्रेच्या नांदेड जिल्ह्यातील शेवटच्या दिवशी अर्धापूर तालुक्यात शुक्रवारी (ता ११) सकाळी आगमन झाले. यात्रेचे पारंपरिक पद्धतीने व उत्साहात स्वागत करण्यात आले. यात्रेच्या मार्गांवर कब्बडीचे सामने रंगले तर कुठं आदिवासी नृत्याने लक्ष वेधले. यात पारंपरिक गोंधळ, लेझीम पथक, भाजणी दिंड्या, दंडार नृत्य यांनी वातावरणात उत्साह निर्माण झाला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी राहुल गांधी यांनी पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.
(Rahul Gandhi Marathi traditional clothing)
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रेचा पाचव्या दिवशीचा प्रवास भोकरफाटा परिसरातुन सुरू झाला. या यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत ज्येष्ठ नेते जयराम रमेश, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले, आमदार अमर राजूरकर, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार माधवराव जवळगावकर, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, पप्पु पाटील कोंढेकर, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसबीर खतीब, शहराध्यक्ष राजू शेटे आदी सहभागी झाले होते.
आमदार सुरेश वरपुडकर यांनी वसमत फाटा परिसरात खास कब्बडीचे सामने, गोंधळाचे आयोजन केले होते. गोंधळ व कब्बडीच्या सामन्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले. शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात माजी सभापती पप्पु बेग व मुसबीर खतीब यांनी खास आदिवासी नृत्यानचे आयोजन केले होते. या नृत्याने एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. तर शहरातील केळीच्या व्यवसायीकांनी केळी, सफरचंद, फराळाचे वाटप केले शेणी पाटी जवळ भजनी मंडळींनी भजन कीर्तन केले व फुलांची उधळण करीत राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. ओबीसी विभागाच्या वतीने विविध महापुरुषांचे सजिव देखावे सादर केले व लेझीम पथकाने स्वागत केले. बसवेश्वर चौकात नगरपंचतीने स्वागत करण्यात आले.
राहुल गांधी खेळले फुटबॉल
यात्रेच्या मार्गांवर विविध कला प्रकार व खेळांच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. मुंबईतून काही विद्यार्थी या यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांनी खासदार राहुल गांधी यांच्या सोबत फुटबॉल खेळला. या विद्यार्थ्यांसोबत खासदार राहुल गांधी यांनी फुटबॉल खेळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.