Rahul Gandhi esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द! नेमकं कारण काय?

रोहित कणसे

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांच्या दौऱ्याबाबात एक महत्वाची अपडेट समोर आली असून राहुल गांधी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकातील बहुशास्त्राधारित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे गांधी यांच्या हस्ते आनावरण होणार होते. शिवाय उद्या राहुल गांधी हे सकाळी साडेआठ वाजता कोल्हापुरात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान स्वागतासाठी आलेले पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यकर्ते नाराज होऊन माघारी परतले आहेत.

विविध कार्यक्रमानिमित्त काँग्रेसने राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर विमानतळ येते त्यांची आगमन होणार होते. त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे कोल्हापूर विमानतळ येथे गांधी यांच्या स्वागतासाठी झाले होते. मात्र विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच पटोले आणि वडेट्टीवार हे कोल्हापूर विमानतळावरून निघून गेले.

दरम्यान कसबा बावडा येथील भगव्या चौकातील होणारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील पुढे ढकलण्यात आले आहे. आजचा अनावरण सोहळा रद्द करण्यात आला असून उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याच्या अनावरण होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये देशातील सर्वात मोठी नक्षलवादी चकमक! आतापर्यंत 30 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

Virender Sehwag Son: भले शाब्बास! सेहवागच्या लेकाने गाजवला पदार्पणाचा सामना, दिल्लीला मिळवून दिला शानदार विजय

NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT