ShivSena Maha Press esakal
महाराष्ट्र बातम्या

ShivSena Maha Press: ठाकरेंच्या सेनेचा 'लाव रे तो व्हिडिओ'! नार्वेकरांचा शिवसेनापक्षप्रमुख पदाचा दावा काढला खोडून

आमदार अपात्रतेच्या निकालावेळी नार्वेकरांनी शिवसेना पक्ष प्रमुख बेकायदा असल्याचं सांगत त्यांना एकनाथ शिंदेंना हटवण्याचा अधिकार नव्हता असं म्हटलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निकालावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख हे पद बेकायदा असल्याचं सांगत त्यांना एकनाथ शिंदेंना हटवण्याचा अधिकार नव्हता असं म्हटलं होतं. त्यामुळं त्यांना एखाद्या सदस्याला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही, असा निकाल दिला होता. पण आता नार्वेकरांचा हा दावाच ठाकरे गटानं कार्यकारिणीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर आणून खोडून काढला आहे. (Rahul Narvekar claim Shiv Sena party chief post is illegal has been debunked by Thackeray group presented videos)

नार्वेकरांनी काय दिला होता निकाल?

शिवसेनाप्रमुख हे शिवसेनेतले सर्वोच्च पद आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १९ सदस्य आहेत. २०१८च्या बदलानुसार शिवसेनेत १३ सदस्य आहेत. पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे, मात्र ते ग्राह्य धरता येणार नाही कारण ते शिवसेनेच्या घटनेत ते नाही. १९९९ च्या घटनेत शिवसेनाप्रमुख हे जे पद आहे, त्याच धर्तीवर २०१८ च्या घटनेतील पक्ष प्रमुख हे पद आहे.

पक्षप्रमुखांना निर्णयाचा एखाद्या व्यक्तीला पक्षातून काढण्याचा अंतिम अधिकार असेल असे ठाकरे गटाकडून म्हटले गेले. पण पक्षप्रमुखांना सदस्याला पक्षातून काढण्याचा अधिकार नाही. कारण पक्षप्रमुखांचा हा अधिकार मान्य केला तर ते कोणत्याही व्यक्तीला दहाव्या परिशिष्टाचा आधार घेत पक्षातून काढू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना काढण्याचा अधिकार मान्य नाही, असे नार्वेकरांनी सांगितले.

कोणती घटना वैध?

उद्धव ठाकरेंकडून २०१८ सालातील घटना सादर करण्यात आली. मात्र ही घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही. २०१८ साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल ग्राह्य धरले जाणार नसून १९९९ साली निवडणूक आयोगाला सादर केलेली घटनाच स्वीकारली आहे. २३ जानेवारी २०१८ साली संघटनात्मक अंतर्गत निवडणुका झाल्याचे सुनील प्रभू यांनी म्हटले होते, मात्र प्रतिपक्षाकडून अशा निवडणुका झाल्या नसल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले.

विधिमंडळातील बहुमत

कोणता गट हा खरा पक्ष आहे? हे ठरविण्यासाठी २०१८ ची घटना ही मोजपट्टी मानता येणार नाही. नेतृत्वाबद्दलही पुरेसे विवेचन केले आहे. त्यामुळेच विधिमंडळातील बहुमताचा विचार करून कोणता गट हा खरी शिवसेना आहे? याचा निर्णय घेत आहे. बहुमत हे एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि त्यामुळे त्यांना मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देत आहे, असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता.

महापत्रकार परिषदेत सादर केलेल्या व्हिडिओत काय?

  1. ठाकरे गटाच्यावतीनं महापत्रकार परिषदेत शिवसेनेच्या २०१३, २०१८ मधील पक्षांतर्गत निवडणुकीच्या ठरावाचे व्हिडिओ दाखवण्यात आले.

  2. यामध्ये २०१३ मध्ये शिवसेनाप्रमुख हे पद गोठवण्यात आल्याचा पहिला ठराव मंजूर करण्यात आला.

  3. शिवसेनाप्रमुख पद फक्त बाळासाहेबांचं आहे, असं यावेळी म्हटलं गेलं.

  4. दुसरा ठराव रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याचा ठराव मांडला.

  5. गजानन किर्तिकर यांनी त्या ठरावला अनुमोदन दिलं होतं.

  6. तिसरा ठराव कार्यकारी अध्यक्षपद रद्द करण्याचा ठराव सुधीर जोशी यांनी मांडला होता.

  7. चौथा ठराव बाळासाहेबांचे सर्व सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा ठराव गजानन कीर्तिकारांनी मांडला होता.

  8. यावेळी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड झाली.

  9. यावेळी 2013च्या बैठकीतील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओ दाखवण्यात आला.

  10. 3 मार्च 2013 ला निवडणूक आयोगाला पोच केल्याचं पत्र दाखवण्यात आलं.

  11. शिवसेनेला पक्षाला मान्यता असल्याचा पुरावे ही दाखवण्यात आले.

  12. 23 जानेवारी 2018 साली दुसरी घटना बैठक झाली. 2018 च्या बैठकीचा व्हिडिओही दाखवण्यात आला.

  13. सन 2018 मध्ये 3 संघटनात्मक ठराव मंजूर करण्यात आले.

  14. यावेळी अनिल देसाई यांनी ठराव मांडले. बाळकृष्ण जोशी यांची निवडूक अधिकारी म्हणून निवड झाली.

  15. आदित्य ठाकरे यांचा युवासेना प्रमुख रामदास कदम यांनी मांडला.

  16. मुख्य निवडणूक अधिकारी बाळकृष्ण जोशी यांनी 2018 च्या निवडणुकीची प्रक्रिया पाडली.

  17. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे निवडून आले.

  18. राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे यांची निवड झाली.

  19. 2018 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून निवड झाली.

  20. शिवसेना नेते म्हणू न निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या पाया पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT