Landslide Pre Alert esakal
महाराष्ट्र बातम्या

Landslide Pre Alert : दरडीची पूर्वसूचना मिळवून लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे काय? दरडी का अन् कधी कोसळते?

हवामान खाते, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या सगळ्यांना याची पूर्वसूचना मिळवून तेथील जनतेचा बचाव शक्य नाही का?

साक्षी राऊत

Landslide Pre Alert : दरवर्षी महाराष्ट्रातील डोंगराळ भागात दरडी कोसळणे काही नवीन नाही. मात्र २००५, २०१४, २०२१ आणि आता २०२३ हे गेल्या दोन दशकांतील असे वर्ष आहेत जेथे पावसामुळे अनेक गावे डोंगराखाली गाडली गेलीत. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो तो असा की, दरडीची पूर्वसूचना मिळू शकते काय? दरडी का आणि कशा कोसळतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेऊया.

पश्चिम घाटातील डोंगरांच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीसाठी पावसाळ्यात अतिवृष्टीचा धोका दरवर्षी उद्भवतो.

दरड कोसळण्यची कारणं काय?

दरड कोसळण्याची तीन मुख्य कारणे आहेत. डोंगराळ भागातील जमिनीतील मातीचे गुणधर्म, खडक, जमिनीच्या थरांची संरचना ज्या प्रकारची असते त्याप्रमाणे त्या भागातील पावसाची तीव्रता ठरते. अशा ठिकाणी कमी अधिक क्षमतेच्या भूकंपामुळे कठीण खडकावरील मातीचा थर मोकळा होतो. ज्यामुळे दरड कोसळू शकते.

याशिवाय शेतीसाठी जमिनीचे सपाटीकरण, निवासी व अन्य कारणांसाठी डोंगर रांगावर वाढते अतिक्रमण, डोंगरातील खोदकाम, डोंगरावरील वृक्षतोड, निर्वनीकरण आदी स्वरुपातील मानवी हस्तक्षेप हा देखील महत्वाचा घटक दरड कोसळण्यास कारणीभूत आहे. 

महाराष्ट्र राज्यातील 15 टक्के भूभाग दरडप्रवण 

महाराष्ट्र राज्यातील एकूण ९ जिल्ह्यांचा भूभाग हा दरडप्रवण असून त्यात पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, मुंबई, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कठीण पाषाणात नैसर्गिकरित्या असलेल्या भेगा, फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत ठरतात. पावसाळ्याच्या काळात खडकातील भेगा आणि फटींमध्ये पाणी शिरुन खडकाची झीज होते. अशा प्रकारचे खडक उतारी प्रदेशात घसरत जावून म्हणजेच दरड कोसळून खालील बाजूस स्थिरावतात.

मुसळधार पावसाच्या दिवसांत उतारी प्रदेशावरुन वाहून जाणारे पाणी सपाटीकरण केलेल्या भागात स्थिरावते आणि मुरण्याच्या प्रक्रियेस सुरूवात होते. यामुळे जांभा खडकांमध्ये विघटन प्रक्रिया गतिमान होते आणि चिबड भूसभूशीत प्रस्तर ढासळतात. माळीण दुर्घटना ही पुणे जिल्ह्याच्या इतिहासातील भूस्खलनाची सर्वात मोठी दुर्घटना होय. 

मोठा पाऊस झाल्यावर रस्त्याच्या किंवा घरांच्या वरच्या भागातील डोंगराच्या मातीत पाणी मुरते. त्याठिकाणी चिखल होतो. मातीत असलेले दगड आणि पाणी यांचे मिश्रण मग तोल जाऊन गुरुत्वाकर्षणाने खाली घसरून येते. दरवर्षी कोसळणाऱ्या बहुतांश दरडी या प्रकारातील असतात. (Maharashtra)

दरड कोसळण्यापूर्वी पूर्वसूचना मिळू शकते काय?

या घटनेची पूर्वसूचना देणे शक्य आहे काय? तर यावर उत्तर आहे होय. पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स या संस्थेने माळीण दुर्घटनेचा शास्त्रीय अभ्यास करून अशा घटनांची पूर्वसूचना देण्याची सतर्क ही सुविधा सुरु केली आहे. 2015 पासून दरडींच्या पूर्वसूचना देण्याचे काम सतर्कतर्फे केले जाते. दरड प्रवण क्षेत्रांवर होणाऱ्या पावसावर सतत नजर ठेवून हे अंदाज दिले जातात. (Landslide)

दरडी कोसळण्याआधी निसर्ग देतोय धोक्याचा इशारा

दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्याआधी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देत असतो. निसर्गाचा हा इशारा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अशी लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढेच नाही तर काही तास आधीही स्पष्ट दिसू लागतात. अशी लक्षणे दिसू लागताच गावकऱ्‍यांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी सज्ज होणे गरजेचे आहे.

दरड कोसळण्यापूर्वीची सर्वसाधारण लक्षणेः
* डोंगर उतारांना तडे जाणे
* तडे गेलेला भूभाग खचू लागणे
* घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड
* झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे
* नवीन झरे निर्माण होणे
* जुने झरे मोठे आणि गढूळ पाणी येणे
* विहिरींच्या पातळीमध्ये अचानक वाढ

अशा वेळी घडते काय ?
* अतिवृष्टीत झऱ्‍यांची क्षमता वाढणे,
* भात खाचरांना भेगा पडणे
* जमिनीला हादरे बसणे
* संपर्क साधने निकामी होणे
* भिंत कोसळणे, घरांना तडे जाणे
* घरांच्या जमिनीखालून पाणी येणे
* विहीर वाहू लागणे
* बोअरिंगमधून पाणी उसळणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT