rain forecast 49 percent rainfall in June 5 44 percent less water storage in dams maharashtra sakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update : जूनमध्ये ४९ टक्के पाऊस; राज्यात धरणांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ५.४४ टक्के कमी जलसाठा

जूनच्या अखेरीस ६१० गावे आणि १ हजार २६६ वाड्यांची तहान भागवण्यासाठी ४९६ टँकर सुरु

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर कालपासून काही ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणसाठ्यातही हळूहळू वाढ होत आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर नसल्याने जून महिन्याच्या सरासरीच्या ४९ टक्केच पावसाची नोंद झज्ञली आहे.

गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात सरासरी १२५, रायगडमध्ये ९६, रत्नागिरीमध्ये ७५, नाशिक जिल्ह्यात १८, धुळ्यात १९, नंदुरबारमध्ये २३ तर औरंगाबादमध्ये १०, परभणीमध्ये ११, नगरमध्ये ७ मिलिमीटर पाऊस झाला. मात्र, हा अपवाद वगळता मॉन्सूनची मेहेरबानी सर्वदूर व्हायची आहे.

विभागनिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी पुढीलप्रमाणे असून (कंसात विभागातील गेल्यावर्षीच्या जूनमधील टक्केवारी) : कोकण-६०.६ (६१.८), नाशिक-४०.४ (८१.१), पुणे-३०.७ (४२), औरंगाबाद-४१.९ (१०४.३), अमरावती-३३.२ (७३.९), नागपूर-६८ (६१.९).

यावरुन नागपूर आणि कोकण विभागात बऱ्यापैकी पाऊस झाल्याचे दिसते. राज्यातील १३९ मोठ्या, २६० मध्यम आणि २ हजार ५९० लघू अशा एकूण २ हजार ९८९ धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्याप ५.४४ टक्के जलसाठा कमी आहे.

गेल्यावर्षी धरणांमध्ये २८.२७ टक्के जलसाठा होता. तो आता २२.८३ टक्के जलसाठा आहे. विभागनिहाय धरणांची संख्या आणि आताच्या जलसाठ्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे (कंसात विभागांतील धरणातील जलसाठ्याची गेल्यावर्षीची टक्केवारी) : अमरावती-२५९-३५.५४ (३८.३४), औरंगाबाद-९१९-२४.६६ (३०.४७), कोकण-१७३-३१.९८ (३५.६४), नागपूर-३८३-४०.६० (२८.६३), नाशिक-५३५-२२.७६ (२२.९९),

पुणे-७२०-११.३४ (१३.५८). राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये २३.०४, मध्यम प्रकल्पांत २९.२६, लघु प्रकल्पांत १५.८६ टक्के जलसाठा आहे.

राज्यात धावताहेत ४८४ टँकर

गेल्यावर्षीच्या जूनच्या अखेरीस ६१० गावे आणि १ हजार २६६ वाड्यांची तहान भागवण्यासाठी ४९६ टँकर सुरु होते. गेल्या तीन दिवसांपूर्वी ६१६ गावे आणि १ हजार ७१५ वाड्यांची तहान भागविण्यासाठी ४८४ टँकर धावताहेत.

कोकणातील सर्वाधिक २८२ गावे आणि ७९६ वाड्यांसाठी १५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागातील ११७ गावे आणि ३०४ वाड्यांसाठी १२९, पुणे विभागातील १३८ गावे व ५९१ वाड्यांसाठी ९९, औरंगाबाद विभागातील ४१ गावे व २४ वाड्यांसाठी ६०, अमरावती विभागातील ३८ गावांसाठी ४२ टँकर सुरु होते. सिंधुदुर्ग, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अद्यापपर्यंत एकही टँकर सुरु करण्यात आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, 'या' ६५ नेत्यांच्या नावांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

Bhushan Pradhan & Anusha Dandekar : "दादा-वहिनी" भूषण-अनुषाच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स ; डेटिंगची रंगली चर्चा

Ulhasnagar News : कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर

Vikramgad Assembly Assembly Election 2024 : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरू

SCROLL FOR NEXT