Weather Update  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पुढील काही दिवस राज्याच्या 'या' भागांमध्ये मुसळधार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल राज्याच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे.

जवळपास महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी पहाटे पावसाने जोरदार पुनरागमन केले. पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यरात्रीनंतर सकाळी साडेआठपर्यंत दहा तासांत ८३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात लोणावळा येथे १०५ मिलिमीटर पाऊस पडला.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह पाऊस हजेरी लावेल. तर, मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाची संततधार दिसून येईल. तर राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसण्यास सुरूवात झाली आहे. पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या ज्योती सोनार यांनी सांगितले आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत आणि या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय? नागरिकांना ५ दिवसांआड पाणी अन् व्यापाऱ्यांना पार्किंगची अपेक्षा; विडी उद्योगातील महिलांना मुला-मुलींच्या भविष्याची चिंता

Sharad Pawar: संघटनेत सक्रिय राहून पक्ष बांधणी करणार!

कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत! ओल्या कांद्याच्या भावात ६०० रुपयांची घसरण; प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा सरासरी भाव; अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

IND vs SA 2nd T20I: द. आफ्रिकेच्या अचुक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी गडगडली! यजमानांना मालिकेत बरोबरीसाठी १२५ धावांची गरज

Nashik Crime: शीर धडावेगळं व्हायचंच बाकी होतं! नाशिकमध्ये मांजाने घेतला एकाचा जीव

SCROLL FOR NEXT