Weather update rain forecast heavy rain in maharashtra Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

MH Rain Update : महाराष्ट्रात पुढील २ ते ३ दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस, IMD चा अंदाज

या दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या पावसाचा मुंबई, ठाणे भागात प्रभाव अधिक असणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

या दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या पावसाचा मुंबई, ठाणे भागात प्रभाव अधिक असणार नाही.

जुलै महिन्याच्या सुरवातीपासून राज्यासह देशातील अनेक भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही भागांत पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. दरम्यान, पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे. (Weather update rain forecast heavy rain in maharashtra)

या महिन्याच्या सुरुवातील पडलेल्या पावसाने कोकणात चागंलीच बॅटिंग केली आहे. कोकण पाठोपाठ विदर्भ, मुबंईसह पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा अधिक प्रभाव जाणवला आहे. त्यामुळे अनेक धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, या दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या पावसाचा मुंबई, ठाणे भागात प्रभाव अधिक असणार नाही, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.

दरम्यान, या महिन्यातील पावसाने कोकण, मुबंई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. पुण्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद २०१४ मध्ये ५३.१ मिलिमीटर तर, त्याआधी १९६७ मध्ये ७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढील चार दिवस शहरासह राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस भारताच्या वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT