Maharashtra Rain Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मध्य महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यासह साताऱ्यातही घाटमाथ्यावर शनिवारी (ता. ३) तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमधील घाट विभागांत शनिवारी २४ तासांत तब्बल २०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

याशिवाय या भागांत ‘रेड अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अत्यंत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज असून घाट विभागात ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

पुण्यात आज, उद्या मध्यम पाऊस :

पुणे आणि परिसरात शनिवारी (ता. ३) आणि रविवारी (ता. ४) आकाश संपूर्णतः ढगाळ राहून मध्यम पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस होईल.

सोमवारपासून (ता. ५) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून पुणे परिसरात आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील. घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhararvi News: धारावीमध्ये तणाव! मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Pitru Paksha 2024 : तुमच्या कुंडलीतही आहे का पितृदोषाचे सावट?; या लक्षणांवरून ओळखा

नवरा माझा नवसाचा 2 Movie Review: कथा नवसाचीच फक्त पॅर्टन वेगळा!

REIT Investment: फक्त 140 रुपयांमध्ये करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक करा; भाड्यातून होईल मोठी कमाई

SCROLL FOR NEXT