Monsoon Update sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update: जूनमध्ये पाऊस सर्वसाधारणच! हवामान विभागाचा अंदाज काय?

मोसमात सरासरीच्या ९६ टक्के; जूनमध्ये मात्र कमी पावसाचा अंदाज

अंकिता खाणे (Ankita Khane)

या वर्षाच्या हंगामात मान्सून सर्वसाधारण असेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने नैर्ऋत्य मान्सूनबद्दलचा दुसरा अंदाज जाहीर केला आहे. जून ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के पर्जन्यमान अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे.

भारतात सर्वसाधारण पाऊस होणार आहे. मात्र जून महिन्यात मात्र पाऊस कमी असु शकतो. जूनमध्ये दक्षिण भारतातील काही भाग, वायव्य भारत, अतिउत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भाग जिथे सामान्यपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, ते वगळता देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्यापेक्षा कमी पाऊस अपेक्षित असल्याचं हवामान विभागाने म्हंटलं आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये जून महिन्यात कमी पावसांची शक्यता आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहणार असल्याचा हवामान खात्याने वर्तवला आहे.

मोसमी पावसाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीइतका पाऊस पडेल, तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी असंही म्हंटलं आहे. जूनमध्ये देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असुन जूनमधील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT