MNS Raj Thackeray Latest Interview esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : ''भारतात लोकशाही नाही'' राज ठाकरेंनी केली अमेरिकेशी तुलना; म्हणाले, ..तरीही त्यांच्या चित्रपटांना त्रास झाला नाही

''भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो. परंतु भारतात लोकशाही नाहीये, असं माझं मत आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही. अमेरिकेत जी आहे ती लोकशाही म्हणता येईल. माणूस केवळ सुशिक्षित असून चालत नाही तर तो सुज्ञ असावा लागतो, तिथेच लोकशाही नांदते.''

संतोष कानडे

MNS Raj Thackeray Latest Interview : अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. शनिवारी या अधिवेशनामध्ये राज ठाकरेंची मुलाखत झाली. या मुलखतीमध्ये राज ठाकरे यांनी राजकीय, समाजिक आणि कलाविषयक मुद्द्यांवरुन मतं व्यक्त केली.

राज ठाकरेंना विचारण्यात आलं की, तुमच्या भाषणांमध्ये कायम व्यवस्थेविरुद्धचा राग दिसतो, अनेकांच्या तो केवळ शब्दात दिसतो. परंतु तुमचा राग शब्दांपलीकडचा आहे.. यामागची कारणं काय आहेत. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा मला सांगायचे की माणूस विचारांनी तरुण पाहिजे. मग राग येणं स्वाभाविक आहे.

राज पुढे म्हणाले की, भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणतो. परंतु भारतात लोकशाही नाहीये, असं माझं मत आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही. अमेरिकेत जी आहे ती लोकशाही म्हणता येईल. माणूस केवळ सुशिक्षित असून चालत नाही तर तो सुज्ञ असावा लागतो, तिथेच लोकशाही नांदते.

याच मुद्द्याला पुष्टी देताना राज ठाकरे पुढे म्हणाले, ऑस्करच्या व्यासपीठावर मेरील स्ट्रिप येतात आणि त्या ट्रम्पच्या विरोधात बोलतात.. त्यांनी इतकं कडवट बोलल्यानंतरही मेरील स्ट्रिपच्या चित्रपटांना काही त्रास होत नाही; याला खरी लोकशाही म्हणतात. मुळात आपल्याकडे शेकडो वर्षे राजा आणि प्रजा, अशीच व्यवस्था होती... अचानक लोकशाही मिळाली. अमेरिका, युरोपात करप्शन नसेल असं नाही पण आपल्याकडे ते खालपर्यंत भिनलं आहे. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवाराच्या अर्जावर अंगठा करण्याचा पर्याय असतो.. त्याला मतं देणारे मात्र पदवीधर लागतात, हे दुर्दैव असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

अमेरिकेतल्या अधिवेशनावर राज ठाकरेंची पोस्ट, जशात तशी...

अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला मी उपस्थित रहावं, अशी विनंती आयोजकांनी केली होती, त्यांचा मान राखून मी सॅन होजेला आलो. यावेळी माझी एक प्रकट मुलाखत पण ठरली होती.

२८ जून २०२४ ला अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी माझी मुलाखत घेतली. बऱ्याच काळाने महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या मराठी जनांना भेटण्याचा योग मला या निमित्ताने आला, अनेकांशी संवाद झाला, ते महाराष्ट्राकडे कसं बघतात हे समजून घेता आलं.

आज मुलाखतीच्या निमित्ताने मुलाखतकारांनी अनेक प्रश्न विचारले, प्रेक्षागृहातील उपस्थित प्रेक्षकांच्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरं देता आली.

यातून त्यांना मी एकूणच राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा विषयांकडे कसं बघतो, हे त्यांना कदाचित पुन्हा एकदा नव्याने समजलं असेल. पण माझ्या तिथे जमलेल्या मराठी जनांकडून पण काय अपेक्षा आहेत, हे देखील मी प्रांजळपणे मुलाखती दरम्यान मांडलं.

आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं भारताबाहेर आहेत, तिथे त्यांनी त्यांचं एक जग उभं केलं, ते तिथे यशस्वी झालेत, या सगळ्या प्रवासात त्यांनी जो अनुभव गोळा केला असेल, जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्या त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल , तर त्या त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत, आणि हे करताना महाराष्ट्रात त्यांनी या राज ठाकरेला गृहीत धरलंत तरी चालेल असं मी आवर्जून सांगितलं.

बाकी आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे २ मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि 'मराठी' म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत हे मी मुलाखतीत सांगितलं. अशी पोस्ट राज ठाकरेंनी एक्सवर केली आहे. सोबत त्यांनी फेसबुकवरील त्यांच्या मुलाखतीच्या व्हिडीओची लिंकदेखील शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT