Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray: "तुमच्या मतांचा अपमान करणाऱ्यांचा वचपा काढा, ही क्रांतीची वेळ मला संधी द्या" राज ठाकरेंचे महाराष्ट्राला आवाहन

आशुतोष मसगौंडे

आज देशासह राज्यभरात दसऱ्याचा सण साजरा होत आहे. दुसरीकडे राज्यात विविध पक्ष आणि संघटनांचे दसरा मेळावे होणार आहेत. अशात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सकाळी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला, तुमची प्रतारणा केली. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, आता वचपा काढण्याची वेळ आली आहे.

यावेळी ठाकरे यांनी महाराष्ट्राला आवाहन करत म्हटले की, "या सत्ताधाऱ्यांनी तुमची फसवणूक केली आहे. आत एकदा माझ्या सहकाऱ्यांंना काम करण्याची संधी द्या, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र करून दाखवतो."

अवघ्या काही मिनिटांच्या या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "आज दसरा आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दर दसऱ्याला आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचे सोने अनेक वर्षांपासून लुटले जात आहे. आपण मात्र फक्त एकमेकांना आपट्याची पाने वाटतो. आपल्या हातात आपट्याच्या पानांशिवाय काहीच राहत नाही आणि बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत. पण आपण मात्र, कधी स्वतःच्या आयुष्यात तर कधी जातीपातीत मशगुल असतो."

राज ठाकरे पुढे म्हणाले, "फ्लायओव्हर्स बांधणे म्हणजे प्रगती नव्हे. आपल्या हातात मोबाईल आला, टीव्ही आला म्हणजे याला प्रगती म्हणता येणार नाही. त्यामुळे प्रगती समाजाची व्हावी लागते. आपण अजूनही चाचपडत आहोत. असे असले तरी तुमच्यातील राग मला दिसत नाही, त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चाताप करत बसता," अशी खंत यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Dasara Melava: "गर्दीचा आशीर्वाद मिळवतो तो दिल्ली झुकवतो..."; जरांगेंचा हुंकार, नारायण गडावर लाखोंची हजेरी

Indapur News : विठ्ठला इंदापूर विधानसभेचा उमेदवार बदला, अन्यथा उद्रेक होईल; शरद पवार यांना विठ्ठलाची उपमा देत साकडे

Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर तिघांची भाजपला सोडचिठ्ठी; राजकीय गोटात चर्चांना उधाण

Dussehra Melava 2024 Live Updates: जय शिवराय म्हणत नारायण गडावर मनोज जरांगे यांच्या भाषणाला सुरुवात

मागील वेळी निसटता पराभव झालेल्या 'या' नेत्याला 'जनसुराज्य'कडून पुन्हा उमेदवारी; आमदार कोरेंची घोषणा

SCROLL FOR NEXT