Raj Thackeray On Reels 
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray On Reels: रिल्स एक विलक्षण हत्यार; राज ठाकरेंचे राज्यभरातील रिल्सस्टार तरुणाईला आवाहन

Sandip Kapde

Raj Thackeray On Reels : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आज १७ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण Reel Baaz पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे देखील उपस्थित होते. यावेळी मनविसेच्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले.

रिल्समधून समाज प्रबोधन झाले पाहीजे, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी उपस्थितांनी मोठ्या घोषणा केल्या. राज ठाकरे यांनी कार्यकर्ते लव्ह यू म्हणत होते. राज ठाकरे यांनी देखील लव्ह यू म्हणत प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी मायकल जॅकसन यांच्या आवाजात लव्ह यू, अशी नक्कल देखील केली. (latest marathi news)

राज ठाकरे म्हणाले, हा कार्यक्रम सुरू असताना मी आत बसलो होतो. घोषणा सुरू होत्या अमित ठाकरे अंगार है बाकी सब भंगार है, मला वाटलं भंगारामध्ये मी तर येत नाही ना, बाकी म्हणजे कोण...?

महाराष्ट्र विद्यार्थी सेनेला आज १७ वर्ष झाली. Reel Baaz पुरस्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला. मला वाटते महाराष्ट्रातील डान्सबार जेव्हा बंद झाले. त्यावेळी लागलेली सवय ती या रिल्सच्या माध्यमातून पूर्ण झाली. एकएकटे बसलेले असतात, काय सुरू आहे काही कळत नाही. माझ्या नजरेत काही जण येतात. त्यांची अप्रतिम समयसुचकता असते. हे एक विलक्षण हत्यार आहे. हे तुमच्या हातात आहे. यातून महाराष्ट्राला प्रबोधन झाले पाहिजे, कारण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मी जास्त बोलणार नाही कारण अमितने मला सांगितले होते. तो म्हाणाला ये आणि दोन मिनिट बोल घरच्यांच्या विरोधात मी जास्त बोलत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, आशाताई भोसले यांचा माझ्याहस्ते सत्कार होता. त्यावेळी मी एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही किती महत्वाच काम करता, याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. पाकिस्तानचे अनेक कलाकार इथं येतात. आपल्याकडे जे लेखक झाले, कलाकार झाले ही विविध अंगांमध्ये तुम्ही देखील येता म्हणजे रिल्स, संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद तुमच्यात आहे.

आज समाज शांत आहे कारण सगळ श्रेय तुमचे आहे. राजकारण ज्या खालच्या स्तरावर गेले त्या स्तरावर तुम्ही जाऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले. 

मनविसेचा नवीन लोगो कसा आहे?

मनविसेचा नवीन लोगोच्या पार्श्वभूमीचा रंग भगवा आहे. तळाची पुस्तक ठेवलेले आहे. या पुस्तकावर खालती टोक असलेली लेखणी आहे. लेखणीच्या वरच्या भागात हात उंचावून जल्लोष करणाऱ्या मानवी आकृती आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT