Raj Thackeray Pune Sabha live Update Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray Pune Sabha : राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचं कारण सांगितलं. तसेच त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकंच नाहीतर मुख्यमंत्र्यांवर देखील जोरदार टीका केली. राज ठाकरे पुण्यात नेमकं काय बोलले? हे आज जाणून घेऊयात.

...तर एकदा तुकडा पाडून टाका, राज ठाकरेंच्या भोंग्यांवरून कार्यकर्त्यांना सूचना

अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झालाय? त्याच्या कबरीसाठी फंड येतो कुठून? औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. आम्हाला काहीही वाटत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली. अजानचा आवाज हळूहळू वाढणार. भोंग्यांचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. हे आंदोलन आहे. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली. जे कायद्यानुसार वागतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? जे कायदे पाळत नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आंदोलने होत राहणार आहे. आमची टीम तयार आहे. हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी एक पत्र देणार आहे आणि ते प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

''पवारांनी बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवली'' -

''औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं? तुम्ही काय करता? एमआयएमच्या अवलादी हे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्त होतात. याचं शिवसेनेला काहीच वाटत नाही. कारण शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची आहे. औरंगजेब हा शरद पवारांना सुफी संत वाटतो का? शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवत आहेत. तरीही शिवसेना पवारांसोबत आहे'', असा टोलाही पवारांनी लगावला.

तुम्ही कोण? मुख्यमंत्र्यांवर टीका -

''राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असं म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही झालं काय फरक पडतो असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे ? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?'' अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

मुख्यमंत्र्यांना टोला -

राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? -

कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. आता आठवलं का? राज ठाकरेंनी माफी मागावी? आतापर्यंत कुठे गेले होते? विषय माफी मागण्याचा आहे ना? गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली - राज ठाकरे

पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे., असा आरोप देखील राज ठाकरेंनी केला.

भाषणाच्या सुरुवातीला पवारांना टोला -

निवडणुका नाही, उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.

अंध विद्यार्थ्यांना मंचावर स्थान -

पुण्यातील अंध विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावली आहे. त्यांना व्यासपीठावर बोलावून राज ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला. त्यांना मंचावर स्थान देण्यात आले.

LIVE Updates :

राज ठाकरे डेक्कन येथून सभा असलेल्या गणेश क्रीड मंचाकडे रवाना झाले आहेत. थोड्याचवेळात ते सभा मंडपी पोहोचतील आणि त्यानंतर सभा सुरू होणार आहे.

आजच्या रॅलीला 10,000-15,000 लोक उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे. राज ठाकरे आज अयोध्या दौऱ्यासह अनेक मुद्द्यांवर बोलणार आहेत, असं पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितलं.

राज ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला सभा घेतली होती. त्यामध्ये मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडली होती. तेव्हापासून राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. त्यानंतर मुंबईत घेतलेली उत्तरसभा आणि औरंगाबादेत घेतलेल्या सभेत देखील त्यांनी भोंग्यांचा मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर त्यांनी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यांचा अयोध्या दौरा प्रचंड चर्चेत होता. त्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. पण, या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी तीव्र विरोध केला होता. त्यांनी गावोगावी जात राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात पाय ठेवू द्यायचा नाही यासाठी प्रचार केला होता. मुंबईत उत्तरभारतीयांवर अत्याचार करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा पवित्रा बृजभूषण यांनी घेतला होता. त्यांनी राज ठाकरेंना खुलं आव्हान दिलं होतं. पण, राज ठाकरेंनी अचानक दौरा रद्द करून सर्व मनसैनिकांना पुण्याच्या सभेत येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेत बृजभूषण यांना उत्तर देणार का? की काही दिवसांत पुन्हा नियोजित अयोध्या दौऱ्यामुळं बृजभूषण यांच्यावर टीका करणं टाळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा? -

उद्धव ठाकरेंची यापूर्वीच मुंबईत सभा झाली. यावेळी त्यांनी मुन्नाभाई म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला होता. तसेच राज ठाकरेंवर सडेतोड टीका केली होती. त्यालाच आज राज ठाकरे उत्तर देण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर काही दिवसांपूर्वी अकबरदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादला येऊन औरंगजेबाच्या कबरीला भेटी दिली. यावर देखील राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी यापूर्वी उपस्थित केलेल्या मशिदीवरील भोंग्यांबाबत ते काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT