Raj Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : भाजपने एक लक्षात ठेवावं, आज भरती सुरुय उद्या ओहोटी...; राज ठाकरेंचा सणसणीत टोला

संतोष कानडे

मुंबईः मनसेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन येथे मनसेच्या वतीने सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

कार्यक्रमामध्ये राज ठाकरे म्हणाले की, कोणतीही सत्ता नसतांना महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांमध्ये जी ऊर्जा त्यामुळे त्यांचे आभार. संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात ते म्हणाले की, ज्याने केलंय त्याला पहिलांदा समजेल त्याने केलंय मग इतरांना कळेल. मनसेच्या मागील १७ वर्षांच्या कामाचं सिंहावलोकन होणं गरजेचं आहे. पक्ष कुठल्या परिस्थितीतून गेला कुठल्या परिस्थितीतून जातोय, हे पाहाणं गरजेचं आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही जण सोडून गेले हे खरंय, परंतु ते एक एकटे गेले. एकत्रित नाही गेले. जे लोक म्हणतात, मनसेचा एकच आमदार आहे त्यांना सांगतो, १३ आमदार निवडून आले ते सोरटवरती आले होते का?

भाजपबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे, त्यांची भरती सुरुय. आहोटी येणार. भरती-ओहोटी येतच असते. राजू पाटील हे एकटे आपल्या पक्षाची बाजू मांडत आहेत, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

आजपर्यंत आपण एकही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. तरीही काही लोक टीका करतात. भाजपने जाहीरनाम्यात दिलं होतं, टोलमुक्त महाराष्ट्र करु..पण एकही पत्रकार त्यांना विचारत नाही. आम्ही काय केलं, हे जनतेला माहिती आहे.

या कार्यक्रमादरम्यान मनसेच्या कामाबद्दलच्या एका पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. मनसेने केलेल्या कामाची माहिती या पुस्तकामध्ये आहे. मनसेने नाशिमध्ये केलेल्या कामाचा पाढाच राज यांनी वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT