raj Thackeray warns to mns party leaders over social media post media appearance Vasant More  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : "...तर हकालपट्टी अटळ आहे", राज ठाकरेंचा वसंत मोरेंना इशारा?

सकाळ डिजिटल टीम

राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून करण्यात येत असलेल्या वादग्रस्त विधानांवरून राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेले वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येऊन अनेक वेळा त्यांची खंत व्यक्त केली आहे. पक्षातील अंतर्गत बाबींवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले होते. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली होती. पण आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी या बाबतीत लक्ष घालून वसंत मोरे यांच्यासह पक्षातील नेत्यांना तंबी दिली आहे.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे की, "माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही." असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, "माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला. पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा."

"पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा." असं राज ठाकरे म्हणालेत. दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील नाराज असलेले मनसे नेते वसंत मोरे यांना इशारा दिला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. "ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या!" असा इशारा देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT