राज्याच्या राजकारणात माजी मंत्री, आमदार विनय कोरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध असतानाही त्यांनी भाजपला साथ दिली.
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहे. न्यायालयाच्या निकालाचे कारण पुढे करत गेली ११ महिने मंत्रिमंडळ विस्तारास विलंब लावण्यात आला. आता मात्र क्षणाचाही विलंब न लावता, विस्तार करावा यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे.
संभाव्य विस्तारात जिल्ह्यातून शिंदे गटाचे नेते माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) व दुसऱ्यांदा आमदार झालेले प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांचे नाव आघाडीवर आहे, तर भाजप, मित्र पक्षांकडून जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अनेक बाबतीत शिंदे सरकारला न्यायालयाने निकाल देत असताना फटकारले. मात्र, या सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवत सरकारला दिलासा दिला. या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले होते. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र झाले तर पुढे काय, याचीही चर्चा सुरु होती. मात्र, तूर्तास तरी शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. या निर्णयाने शिंदे गटासह भाजपमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला गती मिळणार आहे. मंत्रिपदावर असताना आमदार यड्रावकर यांनी गुहाहाटीला जात शिंदे गटात प्रवेश केला. तर आमदार प्रकाश आबिटकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या दोघांनाही मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे.
आमदार यड्रावकर यांचा शिरोळ तालुक्यात मोठा गट आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी आपली ताकत दाखवून दिली आहे. यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी केली आहे. सत्तेत भागीदार असलेल्या भाजपकडूनही तालुक्यात यड्रावकर यांना विरोध केला जात आहे. त्यामुळे शिंदे गटाला यड्रावकर यांच्यामागे ताकत उभी करावी लागणार आहे. मंत्रीपदावर असताना त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने त्यांची दावेदारी प्रबळ आहे.
आमदार आबिटकर हे दुसऱ्यांदा निवडून आलेले ते जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार होते. तरीही त्यांना मंत्रिपदाची संधी दिली नाही. सत्तेतील भाजपचे लोकही आमदार आबिटकर यांच्या विरोधात स्थानिकला काम करतात. त्यामुळे आमदार आबिटकर यांना मंत्री पदाच्या माध्यमातून ताकद देण्याची मागणी होत आहे.
राज्याच्या राजकारणात माजी मंत्री, आमदार विनय कोरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगले संबंध असतानाही त्यांनी भाजपला साथ दिली. सत्ता नसताना विरोधात बसण्याची भूमिका घेतली. सहकारातील एक अभ्यासू, स्पष्टवक्ता नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आमदार कोरे यांना तर पहिल्याच फेरीत मंत्रिपदाची संधी दिली जाईल, अशी शक्यता होती. मात्र ती मिळाली नाही. असे असले तरी येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र आमदार कोरे यांचे मंत्रिपद निश्चित असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.