rajesh tope sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत.

निनाद कुलकर्णी

मुंबई : राज्यात ओमिक्रॉनची (Omicron Cases In Maharashtra) वाढती रूग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लावण्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वेग पाहता ऑक्सिजन वापराच्या मर्यादेचे निकष 500 मॅट्रिक टनापर्यंत खाली आणण्याविषयी विचार सुरु आहे. त्यामुळे भविष्यात जर कोरोना रूग्णांना जेव्हा दररोज 500 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासण्यास सुरुवात होईल, तेव्हा महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू केला जाईल, अशी शक्यता राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Rajesh Tope On LockDown In Maharashtra)

देशासह राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron Cases In India) बाधितांची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या देशात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 415 च्या घरात पोहचली असून महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 108 (Omicron Cases In Maharashtra) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश लावण्याबरोबरच इतर निर्बंध लावण्यात आले आहे. (Maharashtra Government Imposed Act 144 )

सध्या लग्नसराई, ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे. त्यादृष्टीने गर्दी होऊ नये आणि संसर्ग वाढू नये यादृष्टीने निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे बंदिस्त हॉलमध्ये 25 टक्के, तर खुल्या जागेत 50 टक्के उपस्थितांची परवानगी देण्यात आली आहे. युरोप आणि अमेरिकेमध्ये एका दिवसात दुप्पट रूग्णसंख्या होण्याचा रेट आहे. म्हणजेच संसर्गाची गती एका दिवसात डबल होऊ शकते. परंतु, यामध्ये रूग्णालयात भरती होण्याचे प्रमाण आणि मृत्यू दर निश्चितप्रकारे नाहीये, त्यामुळे याबाबत भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, काळजी घेणे गरजेचे असून प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

नियम न पाळणाऱ्यांवर आमचे लक्ष असून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आम्ही ठरविले आहे. सध्या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसून हॉटेल, रेस्टाँरंट 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. राज्यात काही दिवसांपूर्वी दिवसाला करोनाचे 600 ते 700 रुग्ण सापडत होते. आता हे प्रमाण 1400 पर्यंत पोहोचल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडेही आता ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमिक्रॉनचीच असेल, असे टोपे यांनी सांगितले. (Corora Third Wave Maybe Omicron )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT