मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये (health department exam) सुरुवातीपासूनच गोंधळ असल्याचे चित्र होते. विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षेवर चुका होत्या. त्यानंतर राज्य सरकारने वेळेवर परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. मात्र, आता या परीक्षा कधी होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्याचेच उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिले आहे.
आरोग्य विभाग पूर्णपणे परीक्षेचा पाठपुरावा करत होते. मात्र, कंपनीने पूर्वतयारी केली नव्हती. बेंचवर रोल नंबर लिहिलेले नव्हते. काही त्रूटी होत्या. त्यामुळे कंपनीने ८ दिवसांचा वेळ मागितला आहे. परीक्षा रद्द झाली नाही. परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा १०० टक्के होईल. आरोग्य विभागाच्या ज्या जागा आहेत, त्या १०० टक्के भरल्या जाईल, असे राजेश टोपे म्हणाले.
कंपनीने दाखविलेल्या असमर्थतेमुळे आम्हाला पर्याय नव्हता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्री उशिरापर्यंत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला आहे. त्यांच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आरोग्य विभागाची चूक नाही. ती कंपनीची चूक आहे. तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो. कंपनीने मागितलेल्या वेळेमुळे परीक्षा पुढे ढकलली आहे. आरोग्य विभागातील जागा नक्की भरल्या जाणार आहेत. परीक्षा १०० टक्के होईल. उद्या बैठक घेऊन तारीख निश्चित करू. त्यानंतर परीक्षार्थींना परीक्षेची तारीख कळविली जाईल, असेही टोपे म्हणाले.
नेमकं काय घडलं?
आरोग्य विभागाची परीक्षा प्रवेश पत्रामुळे आधीपासूनच चर्चेत होते. त्यात ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींना मोठा मनस्ताप झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता न्यासा कम्युनिकेशनने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर उमेदवारांच्या हिताचा विचार करत कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून गट क मधील जागांसाठीसाठी २५ सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.