Rajmata Jijabai Punyatithi  esakal
महाराष्ट्र बातम्या

Rajmata Jijabai Punyatithi : 'नीजगडे...' नाही तर, ही खास अंगाई गात राजमाता जिजाऊंनी घडवले छत्रपती

राजमाता जिजाईंची आज तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Rajmata Jijabai Punyatithi : राजमाता जिजामाता यांची आज तिथी प्रमाणे पुण्यतिथी आहे. महाराष्ट्र घडवणाऱ्या शिवरायांना घडवणाऱ्या माऊलीच्या कर्तबगारीची महती अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मुघलांच्या जाचापासून मुक्त होऊन स्वराज्य घडावे हे स्वप्न जिजाऊंनी पाहिलं आणि त्याचे बाळकडू त्यांनी शिवरायांना पाजले. त्यातूनच घडले छत्रपती शिवाजी महाराज.

राजमाता जिजामाता भोसले यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला बुलढाण्याच्या सिंदखेड येथे लखुजी जाधव यांच्या परिवारात झाला. त्यांचा शहाजी राज्यांसोबत बालपणीच विवाह झाला. त्यावेळी शहाजी राजे हे आदिलशाही सुलतानाच्या सैन्यात सुभेदार होते. जिजाईंना पतीने कोणत्याही मुस्लिम शासकाची चाकरी करणे आवडत नसे. त्या स्वराज्यवादी विचारांच्या होत्या.

त्यासाठी जिजाऊंना कायम वाटे की आपल्या पोटी असा पुत्र जन्माला यावा जो राष्ट्र संरक्षणासाठी एक सक्षम राष्ट्रनायक असेल. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांची जडणघडणच अशी केली की, त्यांनी स्वराज्य घडवले.

शिवनेरी गडावर सूर्यास्ताच्या वेळी १९ फेब्रुवारी १६३० ला शिवरायांचा जन्म झाला. लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवरायांच्या मनात असे संस्कार रुजवले की जेणे करून ते मोठे झाल्यावर ते लोक कल्याणासाठीच लढतील, एक महान राजा बनतील.

ही अंगाई गाऊन झोपवत छत्रपती शिवरायांना

हिंदवी स्वराज्य घडवणारा महान लोकनायक घडावा म्हणून जिजाऊ त्यांना कर्तुत्ववान योद्ध्यांच्या गोष्टी सांगायच्या, राम, कृष्ण, बलाढ्य भीम आणि पराक्रमी अर्जुनाबद्दल सांगायच्या. जेणे करून शिवरायही त्यांच्याप्रमाणे शूर आणि पराक्रमी बनावे.

जिजाऊ साहेबांनी शिवरायांना पाळण्यात टाकल्यापासून बाळाला अंगाई म्हणून बाळा नीजगडे अशी अंगाई म्हटली नाही, तर बाळा उठ गडे उठ उठ शिवराया आक्रांत झाला, धर्म परसत्तेचेया तालात, परसत्तेच्या आक्रमणामुळे हिंदवी स्वराज्य परस्वाधीन झाले आहे, त्यामुळे उठा शिवराय आणि एका हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. अशी अंगाई म्हणत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT