Rajmata Jijabai Sakal
महाराष्ट्र बातम्या

या शूर घराण्यात झाला 'राजमाता जिजाऊं'चा जन्म!

Rajmata Jijabai Birth Anniversary: राजमाता जिजामातांमध्ये (Rajmata Jijabai) एवढी क्षमता कुठून आली की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्यनिर्मितीची (Swarajya) प्रेरणा दिली? याचं उत्तर राजमाता जिजाऊंच्या बालपणात आहे.

सकाळ डिजिटल टीम

राजमाता जिजाऊ जयंती (Rajmata Jijabai Birth Anniversary):

स्वराज्य! (Swarajy) फक्त महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा काळ. या स्वराज्यासाठी छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली अनेक मावळ्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. अनेक मावळ्यांच्या बलिदानाने स्वराज्य उभं राहिलं. परंतु हा अजरामर इतिहास घडण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) मातोश्री राजमाता जिजाबाईंचा. राजमाता जिजाऊंनी (Rajmata Jijabai) शिवरायांवर केलेलं स्वातंत्र्याचे संस्कार, रयतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची शिकवण यांमुळे शिवरायांना स्वराज्याचं बाळकडू मिळालं. याचं संस्कारातून पुढे स्वराज्य निर्मिती झाले. स्वराज्य निर्मितीचं कार्य हे नक्कीचं सोपं नव्हते. या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांनी जीवाची बाजी लावली होती. राजमाता जिजाऊंनाही यासाठी जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. (Jijamata was born in the family of Lakhuji Jadhavrao.)

यादरम्यान अनेक प्रसंग असे आले की, त्यांना शिवबा किंवा स्वराज्य यांपैकी एक निवडायचं होतं. पण त्यांनी नेहमीच स्वराज्य निवडलं. कारण त्यांना जाणीव होती की फक्त स्वतःच्या लेकराची काळजी करत बसले तर रयतेचं काय होणार? आपल्या मातेच्या स्वराज्यावरील निष्ठेमुळे (Loyalty for the Swarajya)आणि संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या वाटेत आलेल्या प्रत्येक आव्हानाचा सामना केला आणि रयतेचं राज्य म्हणजेचं स्वराज्य निर्माण झाले.

अर्थात एवढी क्षमता जिजामातांमध्ये कुठून आली? याचं उत्तर राजमाता जिजाऊंच्या बालपणात आहे. जिजाऊंच्या जन्म ज्या जाधव घराण्यात झाला, त्या घराण्याची आपण माहिती घेणार आहोत.

जाधव, आद्यदेवगिरी घराण्यातील पिढ्या (Generations of Jadhav, Adyadevagiri family)-

1.रामदेवयादव

2. शंकरदेव (मृ.1312)

3. गोविंददेव (1312-1380)

4. ठाकूरजी (1380- 1429)

5. भूखणदेव (भेतोजी) (1430-1500)

6. अचलकर्ण (अचलोजी) (1500-1540)

7. विठ्ठलदेव (विठोजी) (1540-1470)

8. लक्ष्मणदेव (लखूजी) (1571-1629)जाधव, आद्यदेवगिरी घराण्यातील पिढ्या-

या घराण्यात पुर्वी पुरूषांच्या नावामागे ‘देव’ हे उपपद लागे, परंतु नंतरच्या काळात देव या उपपदाच्या जागी ‘जी’ हे उपपद लागू लागले.

जिजामातांचा जन्म लखुजी जाधवराव (Lakhuji Jadhvarav)यांच्या घराण्यात झाला. लक्ष्मणदेव, लखुजी उर्फ लखुजी जाधवराव सिंदखेडकर हे मुळचे देवगिरिकर जाधव घराण्यांतील. यांच्याकडे सिंदखेडा येथील देशमुखीचे वतन चालु होते. यांनीच हसन गंगू यांस बहामणी राज्य स्थापन करण्यात मदत केली होती. लखुजी जाधवराव व शहाजी राजे यांचे वडील मालोजी निजामशाहीत मनसबदार असल्याने दोघांमध्ये बराच घरोबा झाला होता. याच घरोब्यातून पुढे शहाजीराजे भोसले (Shahajiraje Bhosale) आणि जिजामातांचा (Jijamata) विवाह झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT