Rajmata Jijau Jayanti : आज राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार जयंती. राजमाता ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं त्या मातेविषयी सांगायला शब्द सुद्धा अपुरे पडतील. स्वराज्यचं बी राजमातेनेच शिवाजी महाराजांच्या मनात पेरलं होतं.
एक वीर योद्धा, एक स्वराज्य रक्षक घडवणाऱ्या माता जिजाऊंचं आयुष्यही तितकंच प्रेरीत करणारं आहे. १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या घरी एका कन्येने जन्म घेतला आणि त्या कन्येचं नाव ठेवलं जिजाऊ.
लाल महाल आणि राजमाता जिजाऊंचं नातं
जिजाऊ लहानपणापासूनच हुशार अन् धीट होत्या. शहाजीराजांसोबत जिजाऊंचा विवाह लावून दिला. शहाजी राजेंसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर १९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांनी शिवरायांना जन्म दिला त्यावेळी त्या शिवनेरीवरच होत्या.
मात्र पुण्यातील लाल महालमध्ये जिजाऊंनी बराच काळ घालवला. या ठिकाणी जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. विशेषत: शिवरायांचे बालपणही लाल महालातच गेले. जिजाऊंनी याच लाल महालात शिवाजी महाराजांना संस्कार दिले, त्यांनी वाढवले अन् मोठे केले.
त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या आठवणींसाठी हे लाल महाल ओळखले जाते याशिवाय याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला अद्दल घडवली होती. त्याची बोटे कापली होती.
लाल महाल - ऐतिहासिक वास्तू
लाल महालला महाराष्ट्र आणि मराठा साम्राज्यात ऐतिहासिक महत्त्व आहे. लाल महाल (रेड पॅलेस) हे पुणे येथे शहाजीराजे भोसले यांनी सन 1630 मध्ये पत्नी राजमाता जिजाऊ आणि मुलगा शिवाजी महाराज यांच्यासाठी बनविले होते. शिवनेरी सोडल्यानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी त्यांचं जास्तीत जास्त बालपण येथे घालवलं.
माता जिजाऊ आणि शिवाजी महाराज त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव यांच्यासोबत पुणे येथे आल्या. पुणे शहराला पुनर्जीवित करण्याच्या उद्देशानेच लाल महालचे निर्माण करण्यात आले होते.
शिवकालीन लाल महाल अस्तित्वात नाही
सतराव्या शतकाच्या शेवटी लाल महलाचे अवशेषचं उरले होते. कारण या शहरावर अनेक हल्ले झाले होते. असं म्हणतात की शनिवारवाडाचे निर्माण करताना लाल महलची काही माती आणि दगड वापरण्यात आले होते. मात्र यावर कोणतीही अधिकृत माहिती नाही.
मुळ लाल महाल ज्या जागेवर होता त्याच जागेवर आता लाल महाल पुन्हा साकारण्यात आला. ज्या प्रकारे जुना लाल महाल होता त्याप्रकारेच नवीन लाल महाल बनविण्यात आलेला नाही. जुना लाल महालचे क्षेत्र आणि रचनेविषयी कुणालाही अधिकतर माहिती नाही. सध्याची लाल महाल ही वास्तू पुणे महानगर पालिकेनी १९८८ साली उभारली. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी, जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहे.
लाल महाल दुरूस्तीकरण
गेली पाच वर्ष दुरूस्तीच्या कामाच्या नावाखाली लाल महाल बंद होता. त्यामुळे अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. पुण्यासह महाराष्ट्रातून शेकडो पर्यटक लाल महाल पाहायला यायचे मात्र त्यांना लाल महाल न पाहायला मिळाल्यामुळे निराश होऊन परतायचे.
अनेकांनी पुणे महानगरपालिकेच्या आणि सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणा आणि राजकारणामुळे लालमहाल जाणीवपूर्वक बंद ठेवला ठेवल्याचा आरोप केला होता. विशेष कार्यक्रमाला हा लाल महाल सुरू असायचा मात्र गेल्या वर्षीच 2022 मध्ये बांधकाम आणि दुरुस्तीचं काम पुर्ण झाल्यानंतर लाल महाल सुरू करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.