Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर..; नेमकं काय म्हणाले फडणवीस?

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव करत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी विजय मिळवलाय.

Maharashtra Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेच्या (Shiv Sena) संजय पवार यांचा पराभव करत भाजप उमेदवार धनंजय महाडिक (Dhanjanya Mahadik) यांनी विजय मिळवलाय. या विजयानंतर भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नव्हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला.

तसंच निवडणुकीत भाजपसाठी काहीसा अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणल्यानंतर फडणवीसांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जखमेवर अक्षरश: मीठ चोळलं. राज्यसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली, हे देवेंद्र फडणवीसांनी मुद्दामून जोर देऊन सांगितलं.

फडणवीस पुढं म्हणाले, 'आमच्या सगळ्यांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार याठिकाणी विजयी झाले आहेत. सगळ्यात आधी हा विजय आहे तो मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करतो. दोन्ही आमदार आजारी असूनही मतदानासाठी आले. लक्ष्मण जगताप अॅम्ब्युलन्समधून मोठा प्रवास करून ते इथपर्यंत आले. माझ्या पक्षासाठी मी येणारच असं ते म्हणाले होते आणि ते आले. त्यांचे मी आभार मानतो. मुक्ता टिळक यांचेही आभार मानतो. हा विजय हा सर्वार्थानं महत्वाचा आहे.'

'निवडणुकीत पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मतं, अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आहेत. आमचा तिसरा उमेदवारही शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेऊन निवडणून आलाय. आज भाजपची ताकद बघायला मिळाली.' दरम्यान, फडणवीसांनी ट्विटमध्ये लिहिलंय.. निवडणूक केवळ लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढविली होती.. जय महाराष्ट्र! असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT