rajya sabha election result sanjay raut statement they did not keep their word mumbai sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

‘काही जणांनी शब्द पाळला नाही’ - संजय राऊत

‘‘निवडणुकीच्या घोडेबाजारातील लोकांची मते आम्ही घेऊ शकलो नाही. मात्र, महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाची मते फुटली नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘निवडणुकीच्या घोडेबाजारातील लोकांची मते आम्ही घेऊ शकलो नाही. मात्र, महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाची मते फुटली नाहीत. शब्द देऊनही काही जणांनी तो पाळला नाही,’’ आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, अपक्ष देवेंद्र भुयार, संजय शिंदे, श्यामसुंदर शिंदे यांनी मते दिली नसल्याचेही राऊत यांनी जाहीर केले. पुरेसे संख्याबळ नसतानाही राज्यसभेची सहावी जागा भाजपने जिंकली असून, त्यासाठी महाविकास आघाडीची नऊ मते फोडण्यात या पक्षाला यश आले आहे. त्यावरून ठाकरे सरकारला झटका बसल्याचे मानले जात आहेत. त्यातच आघाडीतील कोणत्या पक्षांची मते फुटली, याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून आघाडीसोबत दगाफटका केलेल्या आमदारांची नावे सांगितले.

पहाटेच्या उपक्रमास शुभेच्छा

‘बाजारातील काही घोडे विकले; त्यासाठी अधिक बोली लावली होती. अशा घोडेबाजारामुळे सरकारला धोका नसतो. हरभरे टाकले जातात; तिथे घोडे धावून जातात. तसेच काहीजण भाजपकडे गेले. आम्ही कोणताही व्यापार केला नाही. मात्र यांना पहाटेची सवय आहे. यांचा पहाटे उपक्रम होता, त्याला शुभेच्छा,’’ असा टोलाही राऊत यांनी लगावला.

निवडणूक आयोगाचा दबाव

राऊत म्हणाले, ‘‘केंद्रीय तपासयंत्रणांचा धाक दाखवून मते मिळवली. या निवडणुकीत ज्या कारणांसाठी शिवसेनेची मते बाद झाली, तसा आक्षेप भाजपच्या मतदारांवर घेतला होता. तरीही त्यांची मते बाद केली नाहीत. भाजपच्या तक्रारीवरून सात तास चौकशी केली. निवडणूक आयोगाच्या दबावाचाही भाजपने वापर केला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शिवसेना उबाठा गटाचे बाळा नर विजयी

Ambernath Assembly Election 2024 Result Live: अंबरनाथमध्ये बालाजी किणीकरांचा विजयी चौकार; शिवसेनेचे राजेश वानखेडे चितपट

SCROLL FOR NEXT