Ramdas Athawale esakal
महाराष्ट्र बातम्या

'मनसेला सोबत घेतल्यास नुकसान; भाजप, आरपीआय युतीला 100 जागा मिळणार'

हेमंत पवार

भाजपने मनसेला सोबत घेतल्यास नुकसान होणार आहे. भाजपने आरपीआयला ताकद दिली तर शंभरहून अधिक जागा मिळतील.

कऱ्हाड (सातारा) : मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Election) जिंकणे भाजपसाठी (BJP) महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरपीआय भाजपसोबत राहणार असून, मुंबईतील दलित मतांचा चांगला फायदा भाजपला होईल. मात्र, भाजपने मनसेला सोबत घेतल्यास नुकसान होणार आहे. भाजपने आरपीआयला ताकद दिली तर शंभरहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी येथे व्यक्त केला.

आरपीआयचे येथील (कै.) युवराज काटरे यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी मंत्री आठवले आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री आठवले म्हणाले, ‘‘मुंबई महापालिका निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आरपीआय (RPI) भाजपसोबत राहणार आहे. त्यामुळे दलित मते मिळून त्याचा भाजपला चांगला फायदा होणार आहे. मात्र, मनसेला सोबत घेतल्यास भाजपचे नुकसान होणार आहे. आरपीआयला ताकद दिली, तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा अशी घोषणा झाल्यास दलित मतदार आमच्या बाजूने उभे राहतील आणि शंभरहून अधिक जागा मिळतील.’’

शेतकरी आंदोलनाबाबत ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन कृषी कायदे आणले आहेत. एक कायदा मागे घेतला, तर अनेक कायदे मागे घ्यावे लागतील. हे कृषी कायदे मागे घेतले तर प्रत्येकवेळी आंदोलन होईल, कायदे मागे घेण्यास सांगितले जाईल. त्यामुळे पार्लमेंटच्या निर्णयाला, मंत्रिमंडळाच्या निर्णयाला काही अर्थ राहणार नाही.’’ ईडीच्या कारवायांबाबत ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचा विनाकारण कोणाला त्रास देणे हा हेतू नाही. ज्या ठिकाणी अनियमितता होते तेथे एनसीबी चौकशी करते. आदरणीय शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ईडीकडून पवारांचे कुटुंब म्हणून त्रास दिला जात नाही. ती चौकशी स्वतंत्ररीत्या होत असते. केंद्र सरकारने पवार कुटुंबीयांना त्रास द्या, असे आदेश दिलेले नाहीत.’’ ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळावे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. केंद्रामधून काही होऊ शकते का याचा विचार आम्ही करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Manoj Kayande Won Sindkhed Raja Election 2024 final result live : 'सिंदखेड राजा'त मनोज कायंदे ठरले 'राजा'? शिंगणेंचा पराभव

Raj Thackeray reaction : अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच...! निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई विजयी

Amgaon Assembly Election Results 2024 : आमगाव मतदारसंघात भाजपने गड राखला! संजय पुरम 110123 बहुमताने विजयी

Samadhan Awatade won Pandharpur Assembly Election: आघाडीमध्ये बिघाडी!समाधान आवताडे यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून सलग दुसऱ्यांदा मारली बाजी

SCROLL FOR NEXT