ramdas athawale offers chief minister post to ncp ajit pawar amide bjp join anjali damanias claim  
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar News : …तर त्यांना मुख्यमंत्री पद देऊ; रामदास आठवलेंची अजित पवारांना खुली ऑफर

रोहित कणसे

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं ट्वीट केल्याने खळबळ उडाली होती.

या चर्चेदरम्यान आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजित पवारांना खास ऑफर दिली आहे. त्यांनी अजित पवार त्यांच्या पक्षात गेले तर आनंदच होईल असेही आठवले म्हणाले आहेत. साम टीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आठवले नेमकं काय म्हणालेत...

अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. पवारसाहेबांनी त्यांना अनेक पदं दिली आहेत. मध्यंतरी अजित पवार आजारी होते म्हणून नॅाट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपात जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र आहेत, म्हणून त्यांनी एकदा पहाटे शपथ घेतली होती. पण आता तसं होणार नाही.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच होईल. आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, असं आश्वासनही रामदास आठवले यांनी दिलं आहे.

ते रडले म्हणून ठाकरे पडले..

आठवलेंनी आदित्य ठाकरे यांनी भाजपाबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या आरोपांवर बोलताना सांगितले की, एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. ते रडणार नाहीत. आदित्य ठाकरेंचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. आपल्या कवितेच्या शैलीत टीका करताना पुढे त्यांनी म्हटलं की, ते रडले म्हणून उद्धव ठाकरे पडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT