Ramdas Athawale on shiv sena sushma andhare criticism mumbai politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Athawale : टिका करायला हरकत नाही, पण सारखी टिका योग्य नाही; रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना सल्ला

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाकरे यांच्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांना शिवसेनेत उपनेते पद दिले गेले आहे. टीका करण्यामध्ये त्या ऍक्टिव्ह आहेत. टिका करायला हरकत नाही, परंतु सारखी टीका करणे योग्य नाही असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना उपनेत्या अंधारे यांना देऊ केला आहे. कल्याण पूर्वेत कालच शिवसेना उपनेत्या अंधारे यांची महा प्रबोधन यात्रा झाली. यावेळी त्यांनी सत्तेतील अनेक नेत्यांवर टिका करत त्यांचा समाचार घेतला. अंधारे या पूर्वी आरपीआय पक्षात होत्या. त्यावरून आठवले यांनी त्यांना मोलाचा सल्ला देऊ केला आहे.

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन कार्यक्रमाचे आयोजन कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिरात करण्यात आले होते. या अधिवेशनास केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी प्रश्नांना उत्तर दिली. शिवसेना उपनेत्या अंधारे या महाप्रबोधन यात्रेत अनेक नेत्यांचा समाचार घेत आहेत याविषयी मंत्री आठवले म्हणाले, सुषमा अंधारे यांना टीका करण्यासाठी शिवसेना पक्षात आणले आहे. त्या चांगल्या प्रवक्त्या आहेत. संघर्ष समितीत असणाऱ्या नेत्या आहेत. चांगल्या ऍक्टिव्ह आहेत. काही वर्ष आमच्या पक्षात होत्या. सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे त्यामुळे असे नेत्यांना उपनेते पद दिला गेलेला आहे आणि टीका करण्यामध्ये द्या ऍक्टिव्ह आहेत करायला हरकत नाही परंतु सारखी टीका करणे योग्य नाही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्याविषयी वक्तव्य केले आहे त्यावर मंत्री आठवले म्हणाले, त्यांनी वक्तव्य केलं त्याबद्दल काही माहित नाही परंतु डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांनी देणगी तसेच स्वतःच्या पैशातून शाळा सुरू केल्या होत्या. त्यांना म्हणायचं असेल की सरकारच्या पैशावर तुम्ही अवलंबून नाही राहिले पाहिजे.

काही लोकांनी स्वतःच्या बळावर शाळा चालवल्या पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलं असावं भीक मागण्याचा विषय काही नाही. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले होते. त्यांनी उभारलेल्या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडलेत. शिक्षणामुळे बुद्धीत भर पडते आणि आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो. त्यामुळे शिक्षण आपण घेतली पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती महापुरुषांचे अवमान आणि राज्यपाल यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे यावर मंत्री आठवले म्हणाले, शिवाजी महाराजांविषयी उलट सुलट असे काही बोलता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने समाजकारण राजकारण सगळेच पक्ष करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचे वक्तव्य करणं योग्य नाही. ते आताच्या पिढीचे सुद्धा आदर्श आहेत आणि पुढच्या पिढीचे सुद्धा आदर्श राहणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य कोणी करू नये. राज्यपाल यांच्या विरोधात असंतोष आहे, अनेकांचे मागणी आहे. यांच्या विषयी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपती यांचा आहे त्यांनी तो लवकर घ्यावा.

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू आहे यावर आठवले म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न हा अनेक वर्षापासूनचा आहे. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय आहे. पण अलीकडे मात्र महाराष्ट्रामध्ये फार मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. कोणी म्हणत कर्नाटक मध्ये टाका, कोणी म्हणत तेलंगणामध्ये टाका, गुजरात मध्ये टाका, अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात बातम्या येऊ लागल्या आहेत. ही गोष्ट महाराष्ट्राच्या हितासाठी चांगली नाही. ज्या लोकांकडे अजिबात लक्ष दिले गेलेले नाही. त्यांचा जो परिसर आहे त्यांनी ती मागणी योग्य नाही कर्नाटक मध्ये टाकण्याचे त्या ठिकाणच्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे यापूर्वीच्या सरकारने तिकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक होते पण तिकडे लक्ष दिले गेलेले नाही गाव कर्नाटक मध्ये टाकण्याचे त्यांनी मागणी करू नये महाराष्ट्र सरकारने दोन हजार कोटी पाण्यासाठी योजना आखली आहे. त्यांचा विषय लवकर सुटला पाहिजे.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे अशी चर्चा आहे, यावर आठवले म्हणाले, शिवसेना आणि वंचित एकत्र आले तरी फारसा काही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर जर एकत्र येत असतील तर त्यांना तो अधिकार आहे. एकत्र यावं पण त्याचा फारसा परिणाम महायुतीवर होणार नाही. कारण फडणवीस यांची बीजेपी आहे, शिंदे यांची शिवसेना आहे आणि माझा आरपीआय आहे. आम्ही सगळे शिवशक्ती भीमशक्ती आणि महायुती स्ट्रॉंग आहोत. मुंबईवर आमचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही त्यासाठी नक्कीच प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहोत. ज्यांना कोणाला एकत्र यायचं त्यांनी यावं. परंतु आमची ताकद मोठी असून आमच्या ताकदीसमोर त्यांना नमवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आठवले यांनी शिवसेना व वंचित पक्षाला दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT