ramdas kadam criticize uddhav thackeray says no moral right to take Balasaheb Thackeray name  sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'बाळासाहेबांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आलाय…'; शिंदे गटातील नेत्याची ठाकरेंवर बोचरी टीका

रोहित कणसे

उद्धव ठाकरे गाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज अमरावती येथे घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दरम्यान भाजपचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेबांच्या पोटी नालायक मुलगा जन्माला आलाय अशा शब्दात रामदास कदम यांनी सुनावलं आहे.

उद्धव ठाकरे यांना मी सांगेन की, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असे रामदास कदम म्हणाले. 1966 साली जेव्हा शिवसेना स्थापन झाली ती हिंदुत्वासाठी. जेव्हा मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल दुकान बंद करेन असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. वडिलांशी बेईमानी करण्याचं, पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यानंतर नैतिक अधिकार आज उद्धव ठाकरे यांना नाही. ते उसनं अवसान आणून बोलताहेत असे रामदास कदम म्हणले.

अजितदादा हे जेव्हा सोबत आमदार घेऊन आले ते पण खोके घेऊन आले का? शिवसेना नाव घेण्याचा नैतिक अधिकार रामदास कदम, एकनाथ शिंदे यांना आहे. आमदार गेले, खासदर गेले पण उद्धव ठाकरे यांचा पीळ गेलेला नाही. अडीच वर्षे मातोश्रीत कोंडून घेतलं होतं ते आता विदर्भ फिरताहेत, हे एकनाथ शिंदे यांच्यामुळे. शिवसेनेच्या नेत्यांना संपवून फक्त स्वतः आणि स्वतःच्या मुलाला मोठं केलं, अशी टीकाही कदम यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगावं ते हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी रामदास कदम आणि त्यांच्या मुलाला संपवण्यासाठी पाच मिटिंग घेतल्या. आदित्य ठाकरे, अनिल परब आणि देसाई यांच्यासोबत बैठका घेतल्या असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT