Ramdas Kadam Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

रामदास कदम शिवसेना सोडणार? पत्रकार परिषदेत फोडणार बॉम्ब

ओमकार वाबळे

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम पक्षाला 'जय महाराष्ट्र' करणार असल्याची चर्चा आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार असून मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जातंय. मागील अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. फडणवीस सरकार असताना कदम यांच्याकडे मंत्रीपद होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र, त्यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आलं. यातच किमान विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची अपेक्षा होती. मात्र ती संधीही डावलण्यात आल्याने रामदास कदम नाराज असल्याचं बोललं जातंय. यातूनच ते निर्णय जाहीर करणार आहेत.

अलीकडेच परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर असताना रामदास कदम समर्थकांची शिवसेनेच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. त्यातच काहींना नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी डावलण्यात आलं. आणि माजी आमदार दळवींच्या समर्थकांना तिकिटं देण्यात आली. ते अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे रामदास कदम(Ramdas Kadam) संतप्त असल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी (MLC elections) शिवसेनेचा मुंबईतून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ही जागा मिळणार की नाही? त्यांना डावललं जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच आज शिवसेनेनं अखेर उमेदवारी जाहीर केली. यावेळी रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा पत्ता कट करून एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्यात आली. त्यामुळे कदम नाराज असल्याची चर्चा होती.

ऑडियो क्लिप प्रकरणानंतर कदमांना डावललं?

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या (Dapoli Nagerpanchayt Election) पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)आणि सूर्यकांत दळवी (Surykant Dalvi) यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला असून त्यांच्यातील राजकीय अहममिकेमुळे दापोली शिवसेनेत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam)यांच्याबाबतच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर दापोलीच्या राजकीय परिस्थितीने 'यू टर्न' घेतला असून पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सेनेची हंगामी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नव्या राजकीय वादाला तोंड फोडल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

कदमांचे शिवसेनेच्या बॅनरवरून फोटोही गायब

दाभोळ - दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 निमित्त आज दापोली येथील केळसकर नाका येथे शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीची जाहीर प्रचार सभा आज आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेच्या स्टेजवर लावलेल्या बॅनर वरून शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे फोटोच गायब होते, तर सात वर्षानंतर माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांचा फोटो मात्र या फ्लेक्सवर लावण्यात आल्याने शिवसैनिकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT