aditya thackeray nilesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

Rane Vs Thackeray: राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे- नीलेश राणे आमनेसामने! समर्थकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, व्हिडिओत पाहा काय घडलं?

Rane Vs Thackeray Video: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर राज्यभरात संताप निर्माण झाले आहे. अशात विरोधी पक्षांनीही सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले आहे.

आशुतोष मसगौंडे

Rajkot Fort News Updates: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर राज्यभरात संताप निर्माण झाले आहे. अशात विरोधी पक्षांनीही सत्ताधारी महायुतीला धारेवर धरले आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणाची पाहणी करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. यामध्ये जयंत पाटील, अंबादस दानवे, अदित्य ठाकरे आणि स्थानिक आमदार वैभव नाईक यांचा समावेश होता.

यावेळी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे तिथेच उपस्थित होते. जेव्हा अदित्य ठाकरे आणि मविआचे नेते परिसरात पोहचले तेव्हा राणे समर्थकांनी अदित्य ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे यांच्या समर्थकांनीही प्रत्युत्तर देत राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली.

इतकेच नव्हे तर पुढे दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये हाणामारी करण्यात महिलाही पुढे असल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अदित्य यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट, मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी राणे कुटुंबियांबाबत बोलताना अदित्य यांनी त्यांना बुद्धी, उंची आणि कोंबड्यांचा उल्लेख करत डिवचले.

दसरीकडे घटनास्थळी माजी खासदार निलेश राणे हे सुद्धा उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी किल्ल्याच्या परिसरातून अदित्य ठाकरे यांना बाहेर काढण्याची मागणी केली.

दरम्यान दोन्ही गट शांत होत नसल्याचे पाहूण पोलिसांनीही लाठीमार केला. दरम्यान यावेळी काही महिलांनी पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान ही प्रकार घडत असताना खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या समर्थकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे समर्थक ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते.

दुसरीकडे ठाकरे यांच्या समर्थक असलेल्या महिला कार्यकर्त्यांनी खासदार राणे यांच्यावर टीका करत ही घटना घडल्यानंतर स्थानिक खासदार इथे आल्याने संताप व्यक्त केला.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT