Rane Vs Thackeray Fight Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rane Vs Thackeray: "मला ओढत तुडवत नेले," ठाकरे गटाच्या महिलेने सांगितले कशी सुरू झाली मारहाण, व्हिडिओ व्हायरल

आशुतोष मसगौंडे

राजकोट किल्ल्यावर दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर राज्यभरातून सरकार आणि या घटनेविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर गेले होते. तेव्हा राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली.

दरम्यान यामध्ये ठाकरे यांच्या महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

यावेळी या महिला संतप्त प्रतिक्रिया देत असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना एका तरुणीने सांगितलेकी यावेळी, त्यांना तुडवून आणि लोळवत नेले.

यावेळी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या, "महाराजांचा पुतळा पडून तीन दिवस झाले. इथे खासदार आता येत आहेत. आम्ही शांतपणे येत होतो तेव्हा त्यांनी राडा केला." यावेळी या महिलेने पोलीस आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले.

दुसरीकडे या घटनेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना एक कार्यकर्ती म्हणाली, "आम्हाल फक्त मारहाण झाली नाही तर आमचं काळीज चिरलं गेलयं. आमच्या या अरबी समुद्रात साडोतिनशे वर्षांपासून महाराजांनी बांधलेला किल्ला तसाच उभा आहे. पण टक्केवारी सरकारमुळे महाराजांचा नुकताच बांधलेला पुतळा 8 महिन्यात पडला."

"मला तुडवत नेले..."

यावेळी साम टीव्हीशी बोलताना एक तरुणी म्हणाली, "आम्हाला त्यांनी तुडवत नेले. पण मी मागे हटणार नाही. मी मालवणची आहे. आणि माझ्या मालवणमध्ये महाराजांचा अपमान होऊ देणार नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप, पोलीस थेट डीजेवर चढले! नेमकं काय घडलं?

Virat-Gambhir Viral Interview : तू पाकिस्तानची केलेली धुलाई...! गौतम गंभीरकडून विराट कोहलीच्या त्या खेळीचं कौतुक, Video

Stock Market Record: शेअर बाजारात नवा विक्रम! निफ्टी 25,500च्या जवळ, सेन्सेक्स 83,300 पार

Latest Maharashtra News Live Updates: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

Gold Import: भारतीयांमध्ये सोन्याची क्रेझ वाढली! सोन्याच्या खरेदीने केला नवीन रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT