50 khoke rapper ram mungase arrested rohit pawar jitendra awad rap song on shinde faction  Sakal
महाराष्ट्र बातम्या

50 Khoke Rap Song : बेपत्ता रॅपर राज मुंगासे अखेर आला समोर; केला मोठा खुलासा

रोहित कणसे

राज्यातील सत्तासंघर्षावर आधारित रॅप गाण्यात ५० खोके आणि चोर असे शब्द वापरल्याने रॅपर राज मुंगासे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र मागील काही दिवासांपासून राज हा गायब होता. त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. आता तो समोर आला असून त्याने तो कुठे होता याबद्दल माहिती दिली आहे.

राज मुंगासे यांनी तयार केलेलम हे रॅप गाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी देखील शेअर केलं होत. दरम्यान सोशल मीडियीवर हे रॅपसॉंग व्हायरल झाल्यानंतर राज मुंगासे विरोधात अंबरनाथमधील एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रॅपर राज मुंगासे बेपत्ता होता. आता त्याने समोर येत टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला तो कुठे होता याबद्दल माहिती दिली आहे.

कुटुंबाला काही महितीच नव्हतं

रॅपर राज मुंगासे याला पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र कोणत्या पोलिसांनी कोठून अटक केली याची माहिती त्यांच्या कुटुंबाला मिळत नव्हती. राज मुंगासेच्या भाऊ पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्याला उडवा उडवीची उत्तरे मिळत होती. त्याची तक्रार पोलिस घेत नव्हते.

तसेच मुंबई पोलिसांना फोन वरून विचारना केली असता, ते सांगतं होते की तो, संभाजीनगरला अटक आहे. पण नेमक्या कोणत्या पोलिस स्टेशनला हे सांगत नव्हते असा आरोप त्यांचा भावाने केला होता. यानंतर राजने तो स्वतःच कुठे होता याबद्दल माहिती दिली होती.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पोलिसांनी अटकच केलं नाही

राज म्हणाला की, मुळात मला अटक झालीच नाही. पण संभाजीनगर पोलिसांचा फोन आला होता. त्यानंतर ते लोक माझ्या घरीही गेले होते. हा रॅप व्हिडीओ डिलीट कर आणि माफीचा व्हिडीओ अपलोड कर, अशाप्रकारे त्यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकला जात होता.

पण मला माहीत होतं की, मी त्या व्हिडीओमध्ये काहीच चुकीचं बोललो नाही. तसेच मी कोणत्याही व्यक्तीची वैयक्तिक बदनामी केली नाही. तुम्ही जर ५० खोके घेतलेच नाहीत तर तुम्ही ते स्वत:वर ओढून का घेताय? मी फक्त चोर म्हणून गाणं केलंय. त्यामुळे तुम्ही चोर असाल, तर ते गाणं तुम्हाला लागणं सहाजिक आहे. पण त्या गाण्यात मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे मला तो व्हिडीओ डिलीट करायचा नव्हता, म्हणून मी तेथून निघून गेलो.

पुढे त्याने सांगितलं की, जेव्हा एफआयआर दाखल झाली, तेव्हा मी त्या एफआयआरचा व्हिडीओ साहेबांना (अंबादास दानवे) शेअर केला. त्यानंतर साहेबांनी त्यांच्या वकिलाचा नंबर दिला. त्यांच्या वकिलांनी मला सहकार्य केलं. तेव्हापासून मी अंडरग्राऊंडच होतो असेही राजने यावेळी सांगितलं.

घरच्यांना याबद्दल माहिती नव्हतं. माझ्या घरचे हळवे आहेत, त्यांनी सांगून दिलं असतं. त्यानंतर शेजारी पाजारी कोण कुठे जाऊन बोलेल आणि पोलिस मला ताब्यात घेतल यांच्यावर माझा विश्वास नाव्हता. अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करायचा होता पण मध्येच तीन दिवस सुट्ट्या आल्या. त्यामुळे मला लपून राहावं लागलं असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT