Narendra Modi Vs Mahadev Jankar esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahadev Jankar : 'आता कोणाकडं तिकिटाची भीक मागणार नाही, मी देखील देशाचा पंतप्रधान होणार'

लोकसभेच्या ४८ जागा नव्हे, तर ५४३ जागा मी लढवणार असून, त्यासाठी संपूर्ण देशातील जनता माझ्या पाठीशी आहे.

सकाळ डिजिटल टीम

आगामी होणारी लोकसभा निवडणूक मी स्वत: लढवणार असून, त्यासाठी माढा, बारामती, परभणी आदीपैकी एक ठिकाणी माझी उमेदवारी निश्चित असणार आहे.

म्हसवड : राज्यातील भाजप (BJP) व कॉँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांची नियतच चांगली नाही, त्यामुळे मी कोणत्याच पक्षावर अवलंबून नाही तर मी माझा स्वत:चा पक्ष राज्यासह देशात वाढवण्यासाठी फिरत असून, मी देखील देशाचा पंतप्रधान होणार आहे.

मी कोणाकडे तिकिटाची भीक मागणारा नाही तर मी तिकीट देणारा नेता आहे, असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी म्हसवड येथे जनस्वराज्य यात्रेत माध्यमाशी संवाद साधताना व्यक्त केला.

या वेळी जानकर म्हणाले, ‘‘लोकसभेच्या ४८ जागा नव्हे, तर ५४३ जागा मी लढवणार असून, त्यासाठी संपूर्ण देशातील जनता माझ्या पाठीशी आहे. गुजरातसह महाराष्ट्रात मी माझ्या रासप पक्षाचा माढा लोकसभा मतदारसंघातून जनसुराज्य यात्रेचा झंझावात सुरू केला आहे.

मी देशातील चार राज्यांत रासप राजकारणात कार्यरत मी देखील राज्यात व देशात पक्ष वाढीचे काम जोमात करीत असून, या कामाला चांगले यश मला मिळत आहे. संपूर्ण देशभरात या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. आगामी होणारी लोकसभा निवडणूक मी स्वत: लढवणार असून, त्यासाठी माढा, बारामती, परभणी आदीपैकी एक ठिकाणी माझी उमेदवारी निश्चित असणार आहे.

तर गुजरातमधूनही मी लोकसभेसाठी उभा राहणार आहे. त्यासाठी मिर्झापूर मतदारसंघात मोर्चेबांधणी झालेली आहे. सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून याबाबत मी निर्णय घेणार आहे. राज्यातील राजकारण हे अतिशय अस्थिर बनले असल्याचेही जानकर यांनी सांगितले. राज्यातील सत्तेत सर्वच विरोधी पक्ष जात असल्याने घटक पक्षांना आता सत्तेत स्थान मिळणार का?

या प्रश्नावर बोलताना आमदार जानकर म्हणाले, की सत्तेत वाटा मागताना आपले नगरसेवक किती, जिल्‍हा परिषद सदस्य किती? आमदार किती, खासदार किती हे तपासणे महत्त्वाचे आहे, त्यासाठीच मी पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करीत असून, अगोदर या पक्षाचे नगरसेवक, आमदार, खासदार जास्तीतजास्त कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करणार आहे.

यासाठी सर्वसामान्य जनता मला मोलाचे सहकार्य करीत आहे. मी कोणत्याही पक्षावर अवलंबून नसून सर्वसामान्य जनतेच्या सहयोगावर अन् त्यांच्या शक्तीवर माझा पक्ष वाढवत आहे. त्यासाठीच मी राज्यभर कार्यकर्त्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत, आज माढा लोकसभा मतदारसंघ मी पिंजून काढणार आहे.’’

जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात वाहनांची रॅली काढत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. म्हसवड शहरात त्यांच्या वाहनांचा ताफा आला असता माजी नगराध्यक्ष तुषार वीरकर यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत केले. या वेळी बबनदादा वीरकर, आप्पासाहेब पुकळे यांनीही आमदार जानकर यांचे म्हसवडनगरीत स्वागत करीत त्यांचा जयघोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT