महाराष्ट्र बातम्या

Sugar Rate: साखरेचा किमान विक्री दर क्विंटलला ४२०० रुपये करा, महासंघाचा केंद्राकडे प्रस्ताव

Harshavardhan Patil : राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (ता. १४) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा

Pune : देशातील सहकारी साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेचा किमान विक्री दर हा गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेला नाही. त्यामुळे या दरात उत्पादन खर्चावर आधारित वाढ होण्याची गरज आहे.

यानुसार या साखरेचा किमान विक्री दर हा ४२०० रुपये इतका करावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

-

या प्रस्तावात साखर उद्योगाबाबतचा आगामी दहा वर्षासाठीचा रोडमॅप देण्यात आला आहे, अशी माहिती या महासंघाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (ता. १४) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

उसाच्या किमान आधारभूत (एफ.आर.पी.) किमतीत दरवर्षी वाढ होत आहे. याउलट गेल्या अनेक वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ झालेली नाही. परिणामी सहकारी साखर साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे साखरेच्या उत्पादन खर्चाच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

साखर उद्योगांपुढील आव्हाने, समस्या व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, केंद्रीय अन्न व सहकार मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सहकार विकास निगमचे (एन.सी.डी. सी.) सर्व संचालक उपस्थित होते.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पाटील यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे हे उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळाच्या पहिला बैठकीत १०० दिवसाच्या विकासाच्या रोडमॅपमध्ये निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या रोडमॅपमध्ये होणाऱ्या निर्णयात साखरेच्या किमान विक्री दराबाबतसुद्धा सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.’’

हर्षवर्धन पाटील म्हणाले,

- केंद्र सरकारने ७ लाख टन बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे

- कारखान्यांच्या थकीत कर्जाची पुनर्बांधणी आणि ६२० कोटींचे व्याज माफ करण्यात महासंघाला यश

- कर्जाची उर्वरित मुद्दल व साध्या व्याजाची ७५८ कोटींची पूर्तता करण्यासाठी सवलत मिळवून देणार

- सवलतीसाठी‘एन.सी.डी. सी.’च्या माध्यमातून संबंधित विभागाकडे नव्याने प्रस्ताव पाठविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT