Uddhav Thackeray vs Ravi Rana esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : आता यांना हिंदुत्व आठवलं, उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फुसका बार; रवी राणांची जोरदार टीका

'हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा.'

सकाळ डिजिटल टीम

'हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा.'

अमरावती : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केल्यानंतर शिवसेनेचा (Shiv Sena) पहिला दसरा मेळावा बुधवारी पार पडला. दोन्ही शिवसेना म्हणजेच, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोन स्वतंत्र्य सभा झाल्या. उद्धव ठाकरेंची सभा शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि एकनाथ शिंदे यांची सभा बीकेसी मैदानावर झाली. दोन्ही सभेला तुफान गर्दी होती. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सभेवर रवी राणांनी निशाणा साधलाय.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवाजी पार्कवरील सभा म्हणजे फुसका बार आहे, अशा शब्दांत रवी राणा (Ravi Rana) यांनी टीका केलीय. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आपल्यामध्ये आणली असल्यामुळं त्यांना हा देखावा करावा लागतोय, असं देखील राणांनी म्हटलंय. ते अमरावतीत बोलत होते.

हिंदुत्वाचा देखावा करण्याची उद्धव ठाकरेंना गरज का पडतेय?

बाळासाहेबांच्या विचारधारेचा विसर पडल्यामुळं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला. हिंदुत्त्वाचं नाव घेऊन, हिंदू विचारांची दिशाभूल ठाकरे करत असल्याचा आरोपही राणा यांनी केलाय. हिंदुत्वाचा देखावा करण्याची गरज उद्धव ठाकरेंना का पडतेय, याचा विचार त्यांनी करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. उद्धव ठाकरेंना आता हिंदुत्व आठवलं, हे त्यांचं दुर्भाग्य आहे, अशी टीकाही राणांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT