Ravikant Tupkar 
महाराष्ट्र बातम्या

Ravikant Tupkar:'सरकार बोलघेवडं, फक्त घोषणा करत..', शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सरकारवर ताशेरे

पिकविम्याचे पैसे देण्यास नकार देणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांनी ताकद दाखवण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार यात्रेची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra News:शेतमालाला रास्त भाव, नुकसानभरपाई देण्यास राज्या सरकारची टाळाटाळ तसेच पिकविम्याचे पैसे देण्यास नकार देणाऱ्या कंपन्यांना शेतकऱ्यांनी ताकद दाखवण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एल्गार यात्रेची घोषणा केली आहे.

शेगाव येथून एक ते २० नोव्हेंबरदरम्यान यात्रा काढण्यात येणार आहे. यादरम्यान केंद्र व राज्य सरकारने रास्त निर्णय घेतले नाही तर महाराष्ट्र जळताना दिसेल, असाही इशारा पत्रकार परिषदेत तुपकर यांनी दिला. आपली ताकद दाखवून देण्यासाठी सर्व शेतकरी व शेतमजुरांनी आपले पक्ष, झेंडे, बॅनर बाजूला ठेवून यात्रेत सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज सात हजार रुपये उत्पादन खर्च असलेल्या सोयाबीनला चार हजार रुपयांत विकावे लागते. कापसाचा खर्च आठ हजार आणि विक्री सात हजार असा आहे. अशीच परिस्‍थिती राहिल्यास शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आम्ही अव्वाच्या सव्वा भाव मागत नाही. किमान एका पोत्यावर हजार रुपये तरी शेतकऱ्यांना मिळावे, ही आमची मागणी आहे. शेतकऱ्यांची एकजूट आणि आंदोलनामुळे काय मिळू शकते, हे बुलडाणा जिल्ह्याने दाखवून दिले. त्यामुळे सरकारला कसे झुकवायचे याचा आम्हाला चांगला अभ्यास असल्याचे ते म्हणाले.(Latest Marathi News)

विदर्भातील पिके वाऱ्यावर

उसाला वीज आणि युरियाचे अनुदान दिले जाते. उसाचे भाव ठरवण्यासाठी समिती आहे. वर्षभरात चार बैठका समिती घेते. मात्र विदर्भातील कापूस, धान, सोयाबीनला कुठल्याच सवलती दिल्या जात नाही. हमी भाव ठरविताना उत्पादन खर्चाचा विचार केला जात नाही, असेही तुपकर यांनी सांगितले.

सरकार बोलघेवडे

हे सरकार बोलघेवडे आहे. घोषणा करते, मात्र प्रत्यक्षात काहीच देत नाही. या सरकारचे विमा कंपन्यांसोबतच साटेलोटे आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचे ऑडिट केल्यास सर्वात मोठा घोटाळा उघडकीस येऊ शकतो, याकडे तुपकर यांनी लक्ष वेधले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT