Sadabhau Khot sakal
महाराष्ट्र बातम्या

Sadabhau Khot : 'राष्ट्रवादीच्या बैलाला शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा...'; उस निर्यात बंदीवरून खोतांचा इशारा

तुम्ही आमचे घरे लुटणार असाल तर साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू.

दत्ता लवांडे

राज्यातील उस बाहेरच्या राज्यांना देण्यास राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका, अन्यथा त्यांना आम्ही ठेचून काढू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

पुण्याचे साखर आयुक्त कार्यालय हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणारं कोठार आहे, त्याला आम्ही आग लावू, यावर्षी शेतकऱ्याच्या उसाला सोन्याचा भाव मिळणार आहे पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळायला लागला की सरकारच्या पोटात दुखतं असंही वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"शेतकऱ्यांच्या उसाला या वर्षी सोन्याचा भाव मिळणार आहे. पण सरकारला शेतकऱ्याचा उस भंगाराच्या भावात खरेदी करायचा आहे. त्यामुळे सहकार विभागाने आणि सरकारने शेतकऱ्यांना बाहेरच्या राज्यात उस देण्यावर मनाई केली आहे. खरं तर शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय आहे."

"आमच्या बापानं आणि आम्ही पिकवलेला उस साखर कारखान्यांना द्यावा की, कर्नाटकला द्यावा की, गुजरातला द्यावा हा आमचा अधिकार आहे. पण दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले की सरकारच्या पोटात दुखतं."

"राज्याच्या मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की राष्ट्रवादीच्या वळू बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर या वळू बैलांना ठेचून काढल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी राहणार नाही."

"पुण्याचं सहकार आयुक्त कार्यालय शेतकऱ्यांना लुटण्याचं कोठार आहे. जर तुम्ही आम्हाला लुटणार असाल तर साखर आयुक्त कार्यालय सुद्धा आम्ही जाळून टाकू. सरकारने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा नाहीतर शेतकरी रस्त्यावर तर उतरेल, पण आम्ही कर्नाटकमध्ये वाजत गाजत उस घेऊन जाऊ." असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिलाय.

जिथे भाव मिळेल तिथेच उस देणार - राजू शेट्टी

राज्याचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याबाहेर उस नेण्यास बंदीचे आदेश काढल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मोर्चा काढत सरकारला आव्हान दिलं आहे. ज्या राज्यात आम्हाला चांगला दर मिळेल त्या राज्यात आम्ही उस नेणार असा इशारा त्यांनी दिला.

सदाभाऊ खोत 'राष्ट्रवादीचे वळू' कुणाला म्हणाले?

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातं दिलं. तर याच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोत यांनी निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Terminus चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! Platform Ticket ची विक्री बंद, पण किती दिवसांसाठी? जाणून घ्या

Pakistan Economical Crisis : IMF च्या कर्जानंतरही पाकिस्तानचे हाल सुरूच... आता चीनकडून मागितलं अब्जावधींचं कर्ज

Mohol Assembly Election 2024 : अखेर मोहोळ विधानसभेचा सस्पेन्स संपला, सिद्धी कदम महाविकास आघाडीच्या उमेदवार

Soneri Bhog Sweet: 24 कॅरेट सोन्याचा वापर; महाराष्ट्रात 'सोनेरी भोग' मिठाई आकर्षणाचे केंद्र, किंमत ऐकून व्हाल थक्क

Pakistan Cricket: पाकिस्तानने नवा ODI-T20I कॅप्टन केला जाहीर; 'हा' खेळाडू घेणार बाबर आझमची जागा

SCROLL FOR NEXT