शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्रा आज मनमाडमध्ये येणार आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्या ठाकरेंना आव्हान दिले आहे. हिंदुत्वासाठी लढलो ही चूक झाली का? असा आदित्य ठाकरेंना सुहास कांदे विचारणार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर आमदारकीचा राजीनामादेखील देण्यात तयार असल्याचे म्हणले आहे.(rebel mla suhas kande question to aaditya thackeray Eknath Shinde)
बंडखोर आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांना निवेदन देणार आहेत. 'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदार संघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख निवेदनात असणार आहे. सुहास कांदे यांच्या मतदारसंघात मनमाडला आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे.
हिंदुत्वासाठी लढलो यात माझी काय चूक झाली? असा सवाल आदित्य ठाकरे यांना करणार असल्याचे सुहास कांदे यांनी यावेळी सांगितले. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरूनही ते आदित्य ठाकरेंना काही सवाल करणार आहेत. आपल्या प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिल्यास राजीनामा लढवून निवडणूक लढवू, असं आव्हानच कांदे यांनी आदित्य यांना दिलं आहे. त्यामुळे कांदे-आदित्य ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (maharashtra politics)
एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली. तरीही त्यांना झेडप्लस सुरक्षा दिली नाही. गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं शिंदेंना सुरक्षा देऊ नका. हा काय प्रकार आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध अस्लम शेख आणि नवाब मलिक यांनी विरोध केला होता. त्यांच्या मांडिला मांडू लावून बसायचं का? रेल्वेत बॉम्बस्फोट झाले. त्यात दाऊदचा हात असल्याचं उघड झालं. त्या दाऊदच्या सोबत नवाब मलिक यांचं कनेक्शन असल्याचं उघड झाले. अशा लोकांच्या मांडिला मांडी लावून बसायचे का? ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली. त्यांना टी बाळू म्हणून हिणवले. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं का?, असा सवाल आदित्य यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इतकेच नव्हे तर आदित्य ठाकरेंशी भेट झाली नाही तर रास्तारोको करू पण आदित्य ठाकरेंना भेटणारच. त्यांना भेटून सर्व जाब विचारणार असल्याचे ठाम मत सुहास कांदेंनी यावेळी सांगितले.
यसोबतच, काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हटले. त्यांच्याविरोधात आम्ही बोलू शकत नव्हतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. अशा काँग्रेसच्याही मांडिला मांडी लावून बसायचं का? माझ्या मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी पर्यटन खात्याकडे 100 कोटी मागितले. ते दिले नाही.
पण माझ्या बाजूच्याच मतदारसंघात येवल्यात 200 कोटी रुपये दिले. तरीही काँग्रेससोबत राहायचे का? माझ्या मतदारसंघातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याकडेही ठाकरे सरकारने लक्ष दिलं नाही. काम होत नव्हती. त्यावर काय उत्तर देणार आहात? असा सवालही आदित्य यांना करणार आहे. त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली तर मी आमदारकीचा राजीनामा देईन, असं आव्हानच सुहास कांदेंनी यावेळी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.