सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांवरील १८६ सेविका व जवळपास ७५० मदतनीस पदांची भरती ३० एप्रिलपर्यंत केली जात आहे. सांगोला, कोळा, करमाळा तालुक्यातील पदभरतीसाठी २५ मार्चपर्यंत तर सोलापूर शहर, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट येथील पदभरतीसाठी २१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तसेच उर्वरित तालुक्यातील भरती प्रक्रिया १५ मार्चपासून सुरु होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत मुदत असणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील भरती ३१ मेपूर्वी उरकली जाणार आहे.
सोलापूर, बार्शी नागरी प्रकल्प आणि सोलापूर-अक्कलकोट नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे यांच्या सोलापुरातील अंत्रोळीकर नगरातील आर्किटेक कॉलेजशेजारील कार्यालयाकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. तर पंढरपूर, करमाळा, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यांच्या शहरी भागातील महिला उमेदवारांना पंढरपूर शहरातील बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा पाटील यांच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल. शहरातील प्रकल्प एकअंतर्गतचे अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव यांच्या सुपर मार्केटवरील कार्यालयात अर्ज करावे लागतील. दरम्यान, सोलापूर, पंढरपूर व बार्शी येथील काही शहरी भागाचे अर्ज नागरी प्रकल्प-दोन कार्यालय, रंगभवन ख्रिश्चन हौसिंग सोसायटी येथे अर्ज करावे लागतील. http//solapur.gov.in या संकेतस्थळावर भरतीची संपूर्ण माहिती व अर्ज उपलब्ध आहे.
अर्ज जमा कोठे करायचा?
संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून त्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित शहर किंवा तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात मुदतीत तो जमा करायचा आहे. सोलापूरसह प्रत्येक तालुक्याचा शहरी भाग व ग्रामीण भाग, असे स्वतंत्रपणे अर्ज आहेत. अर्ज करणारा उमेदवार त्या गावातील किंवा परिसरातील स्थानिक रहिवासी असावा, अशी अट आहे. भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे. तर विधवा महिला उमेदवारास ४० पर्यंत वयोमर्यादा आहे.
१०० गुणातून होणार अंतिम निवड
शासनाच्या निर्णयानुसार उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेतील टक्केवारीच्या आधारावर ७५ गुण दिले जातील. तर दुसरीकडे विधवा किंवा अनाथ उमेदवारास दहा गुण, अनुसूचित जाती-जमातीसाठी दहा गुण, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवाराला पाच गुण आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस म्हणून यापूर्वी कामाचा अनुभव असल्यास पाच गुण मिळणार आहेत. या प्रक्रियेत ज्या उमेदवारास सर्वाधिक गुण, त्याचीच निवड होईल.
मराठीतूनच भरता येईल पोषण ट्रॅकर’ची माहिती
बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना आता ‘पोषण ट्रॅकर’वरील माहिती मराठीतूनच भरण्याची सोय उपलब्ध आहे. मुलाची नोंदणी करताना सुरवातीला आधारकार्डवरून त्याचे नाव इंग्रजीत भरावे लागेल. त्यानंतर महिन्यातून एकदा मुलांचे वजन, दररोज अंगणवाडी उघडल्याची वेळ, आहार किती दिला, यासंबंधीची माहिती मराठीतूनच भरता येईल. नवीन शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये तर मदतीस महिलेला साडेपाच हजार रुपयांचे मानधन मिळणार आहे. ‘पोषण ट्रॅकर’वरील माहिती अचूक भरल्यास सेविकेला ५०० रुपये तर मदतनीस महिलेला २५० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.