schools sakal
महाराष्ट्र बातम्या

जिल्हा परिषदांमध्ये २१००० शिक्षक भरती! ३० जिल्ह्यांची बिंदुनामावली अंतिम; ‘या’ ४ जिल्ह्यांमुळे भरतीचे वेळापत्रक लांबणीवर

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये २१ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्याअनुषंगाने ३० जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाने अंतिम केली आहे. शिक्षक भरतीतील उमेदवारांना दिवाळीनंतर प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये २१ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्याअनुषंगाने ३० जिल्हा परिषदांची बिंदुनामावली मागासवर्गीय कक्षाने अंतिम केली आहे. शिक्षक भरतीतील उमेदवारांना दिवाळीनंतर प्राधान्यक्रम भरण्यास प्रारंभ होणार आहे.

शिक्षक भरतीसाठी राज्यातील एक लाख ६५ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सध्या १६ ऑक्टोबरपासून ‘पवित्र’ पोर्टलवर जात प्रवर्गनिहाय जाहिराती अपलोड करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदांकडून सुरु आहे. परंतु, बिंदुनामावली अंतिम न झालेल्या जिल्हा परिषदांमुळे प्राधान्यक्रम भरण्याचा कालावधी लांबणीवर पडला आहे.

आता डिसेंबर- जानेवारीपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन कोलमडले असून त्यासाठी एक महिना विलंब होवू शकतो. दरम्यान, अनुदानित माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही साधारणत: दहा हजार पदे भरली जाणार आहेत. संबंधित शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून रोस्टर तपासणी करून घेतल्यानंतर त्या संस्थांकडूनच रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होणे अपेक्षित आहे. परंतु, त्यासंबंधीची कार्यवाही संथ गतीने सुरु असल्याची स्थिती असून सर्वप्रथम जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

‘या’ जिल्ह्याची राहिली बिंदुनामावली

राज्यातील ३४ पैकी ३० जिल्हा परिषदांमधील शाळांमधील प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली अंतिम झाली आहे. सध्या सोलापूर, अकोला, वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यांची बिंदुनामावली राज्य मागासवर्गीय कक्षाकडून तपासली जात आहे. पुढील आठवड्यापर्यंत त्या जिल्हा परिषदांची बिंदुनामावली अंतिम झाल्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलवर त्यांना रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड कराव्या लागतील. त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन मेरिट (गुणवत्ता) यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना संबंधित ठिकाणी नेमणूक मिळणार आहे. प्राधान्यक्रम भरताना जिल्ह्यांची मर्यादा नसणार आहे. पण, विषय शिक्षकासाठी त्या त्या विषयातील पदवीधर उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.

शिक्षक भरतीची सद्य:स्थिती

  • भरती होणारे शिक्षक

  • २१,०००

  • भरतीसाठी उमेदवारांचे अर्ज

  • १.६५ लाख

  • बिंदुनामावली अंतिम

  • ३० जिल्हे

  • प्राधान्यक्रम नोंदणीला प्रारंभ

  • २८ नोव्हेंबरनंतर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT