ShivendrasinharajeBhosle vs Deepak Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'राष्ट्रवादीच्या दीपक पवारांना राजकारणातून कायमचं हद्दपार करा'

महेश बारटक्के

'पवारांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या हेतूनं प्रतापगड कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली आहे.'

कुडाळ (सातारा) : सभासद हा कारखान्याचा मालक असतो. त्यामुळे सभासदांनाच कारखान्याबद्दल बोलायचा अधिकार आहे. मात्र, जे कारखान्याचे सभासदच नाहीत. अशा दीपक पवारांनी (Deepak Pawar) केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या हेतूने व हट्टीपणामुळे प्रतापगड कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली आहे. सहकाराचा अनुभव नसलेल्यांना कारखान्याच्याच नव्हे, तर तालुक्याच्या राजकारणातून कायमचे हद्दपार करा. निवडणुकीत बचाव पॅनेल काढणाऱ्यांपासूनच बचावाची वेळ जावळी तालुक्यातील (Jawali taluka) जनतेवर आली आहे, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांनी केली.

खर्शी (ता. जावळी) येथे संस्थापक सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. भोसले म्हणाले, ‘‘कारखाना आर्थिक व नैसर्गिक संकटात सापडल्याने अडचणीत आला. मात्र, सौरभ शिंदे यांनी हा कारखाना लिलाव प्रक्रियेपासून वाचवला व सभासदांच्या मालकीचा ठेवला, ही सभासदांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. म्हणूनच सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेलच्या पाठीशी सभासदांनी खंबीरपणे उभे राहावे. कारखाना सध्या अडचणीत असताना संस्थेवर निवडणूक लादून विरोधकांनी संस्थेवर २५ लाखांचा बोजा वाढवला आहे. ज्यांना तालुक्यात साधी पतसंस्था चालवता आली नाही. स्वतःची बँक बुडवली अशा अपप्रवृत्तींच्या भूलथापांना बळी पडू नका. त्यांच्यापासून सावध राहा अन्यथा अशी मंडळी कारखान्यावर साधा पत्राही शिल्लक ठेवणार नाहीत.’’

या वेळी वसंतराव मानकुमरे म्हणाले, ‘‘सौरभ शिंदे यांनी प्रतापगड कारखान्याच्या निवडणुकीच्या (Pratapgad Factory Election) निमित्ताने आमदार भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.’’ सौरभ शिंदे यांचेही भाषण झाले. या वेळी कारखान्याच्या प्रचाराचा प्रारंभ सभासदांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, ॲड. शिवाजीराव मर्ढेकर, अंकुशराव शिवणकर, दादा परांदे, नाना पवार, प्रदीप शिंदे, बाळासाहेब निकम, विठ्ठल मोरे, प्रदीप तरडे, रामदास पार्टे, आनंदराव जुनघरे, आनंदराव मोहिते, दिलीप वांगडे, विजय शेवते, बाळकृष्ण निकम आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT