महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : निधीतून १४ हजार कोटींचा गैरव्यवहार;रोहित पवार यांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महायुतीचे सरकार कमिशन खाण्यात व्यग्र असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांसाठी निधी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) या नव्याने स्थापन केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून ३५-४० हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करून ६ हजार कोटी रुपयांचे कमिशन खाल्ले. यात एकूण १२ ते १४ हजार कोटींचा गैरव्यवहार केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यात घाईघाईने ४० हजार कोटींच्या रस्त्यांच्या कामांची निविदा काढण्यात आली होती. निविदा काढताना अंदाजपत्रकात १० टक्के वाढ करण्यात आली. त्यामुळे चार हजार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.

महामंडळाकडून १४६ निविदा काढण्यात आल्या. त्या २०-२५ टक्के वाढीव दराने भरल्या गेल्या. म्हणजेच मुळात १० टक्के वाढीव दराने काढलेल्या निविदा या नंतर २०-२५ टक्के वाढीव दराने भरण्यात आल्या. या कामाची किंमत जवळपास ३५ टक्के एवढी वाढविण्यात आली. त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयांच्या ३५ टक्के म्हणजेच जवळपास १२ ते १४ हजार कोटी रुपयांचा उघड गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

निविदा प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाला असून निधी नसताना केवळ भ्रष्टाचार घडवण्यासाठी हा गैरव्यवहार केला गेला आहे. यात संबंधित खात्याचे मंत्री, एमएसआयडीसी व्यवस्थापकीय संचालक आणि एका उच्चपदस्थ अभियंत्याचा हात आहे.

- रोहित पवार, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पठ्ठ्यानं 31000 करोडला विकली कंपनी अन् कर्मचाऱ्यांना 40 कोटींचा फायदा, कोण आहेत तो भारतीय उद्योगपती?

Navratri 2024: मुलींना वयाच्या ५ व्या वर्षी शिकवाव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी, प्रत्येक आई-वडीलांची जबाबदारी

अरे भाऊ...! भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीवर कॅप्टन Suryakumar Yadav इम्प्रेस, भन्नाट Video

Rhea Chakraborty : ड्रग्स घोटाळ्यातून सुटते न सुटते तोच रिया अडकली पुन्हा संकटात ! 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Oneplus Poco Ban in India : भारतात बंद होणार वनप्लस अन् पोकोचे स्मार्टफोन; मोठ्या स्तरावरून होतीये मागणी,नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT